नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या अंतिम दिवशी नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भव्य रोड शो काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसदेखील सहभागी झाल्या होत्या. तर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आलेले विद्यमान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रोड शोदरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोबत रथातच ठेवले आहे. फडणवीसांनी कालच भर सभेत बावनकुळे आमचा हिरा आहे, ते आहेत त्यापेक्षा मोठे झालेले दिसतील असे म्हटले होते.

दोन किलोमीटरच्या या रोड शोमध्ये हजारोच्या संख्येने भाजपा समर्थक सहभागी झाले आहेत. भाजपा कार्यकर्त्यांनी निळे फेटे बांधले होते. तर भाजपाच्या महिला कार्यकर्त्या नऊवारी साडी नेसून नटून थटून रोड शोमध्ये फुगड्या खेळताना दिसल्या. मुख्यमंत्र्यांनी माटे चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शोला सुरुवात केली. तर भेंडे ले आउट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शोचा समारोप झाला. यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समर्थकांचे आभार मानले. या विधानसभा  निवडणुकीत युतीचा विजय होईल, महाराष्ट्रात युती नवा विक्रम रचेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल – संजय राऊत

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सत्तास्थापनेबाबत उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सरकार सत्तेत येईल’, असा विश्वास व्यक्त केला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

शरद पवार आज मोदींना भेटणार! समीकरणे बदलणार?

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. संसद भवनात आज दुपारी १२.४० वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

‘अपनों के विघ्नों ने घेरा’ – संजय राऊत

मुंबई – दररोज ट्विट आणि पत्रकार परिषदेतून भाजपावर तोफ डागणारे संजय राऊत यांनी आज ‘अपनों के विघ्नों ने घेरा’ असे म्हणत भाजपाला डिवचले आहे. आज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

ज्युलियन असांजेला दिलासा; बलात्काराचा गुन्हा रद्द

लंडन – अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारा ‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजे याला मोठा दिलासा मिळाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘चैत्या’ आता तेलुगू चित्रपटात झळकणार

मुंबई – अभिनेते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटातून झळकलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार श्रीनिवास पोकळे अर्थात सर्वांचा लाडका चैत्या आता तेलुगू चित्रपटात दिसणार...
Read More