नागपुरातील दाभा परिसरात बिबट्याची दहशत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना – eNavakal
News महाराष्ट्र

नागपुरातील दाभा परिसरात बिबट्याची दहशत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना

नागपूर – गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या दाभा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने दहशत पसरवली आहे. दरम्यान वन विभागानेसुद्धा परिसरातील नागरिकांना सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्या आहेत.
गोरेवाडा जंगलाची सुरक्षा भिंत दाभा परिसरातील न्यू शांती ले-आऊट, मडावी ले-आऊटच्या जवळपास 60 ते 70 मीटर अंतरावर आहे. भिंतीची उंची केवळ आठ फूट असून गेल्या पाच दिवसांपासून येथे बिबट ठिय्या आढळून आला आहे. सुरक्षा भिंतीवर दोन ते तीन तास बिबट बसून असल्याचा व्हिडिओसुद्धा काही नागरिकांनी तयार केला आहे. त्याला हाकलून लावण्यासाठी काहींनी दगडाचा माराही केला. मात्र तो जागचा हालला नाही. याबाबत वन अधिकार्‍यांना सूचित करण्यात आले. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी बिबट्याचा शोधही घेतला परंतु तो कुठेच आढळून आला नाही. परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

मॅच फिक्सिंगप्रकरणी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची कबुली

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्डला तुरुंगवास भोगाावा लागला. कनेरियाने तब्बल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार?

नवी दिल्ली – देशातील जवळपास ५० कोटी मोबाईलधारकांचे सिम ‘डिस्कनेक्ट’ होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

…अन्यथा दिल्लीत पेट्रोल पंप बंद राहणार

नवी दिल्ली – पेट्रोल-डीझेलच्या व्हॅटमध्ये कपात न केल्यास दिल्लीतील पेट्रोल पंप संचालकांनी २२ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात दिल्लीतील चारशेहून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

शबरीमाला मंदिराचा वाद चिघळला; जमावबंदी लागू

तिरुअनंतपूरम – केरळमधील प्रसिध्द शबरीमला मंदिरात कालपासून सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात येणार हेता, पण तेथील काही धार्मिक संघटनांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला कडाडुन विरोध...
Read More
post-image
देश

पुलवामात एका दहशतवाद्याला कंठस्नान

श्रीनगर – काश्मीरच्या दक्षिण भागातील पुलवामात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. पुलवामामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच भारतीय जवानांनी...
Read More