नांदेड-मुंबई या विमानसेवेस आज पासून सुरुवात – eNavakal
महाराष्ट्र

नांदेड-मुंबई या विमानसेवेस आज पासून सुरुवात

नांदेड- चार वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नांदेड-मुंबई या विमानसेवेस आज पासून उडान योजने अंतर्गत प्रारंभ झाला. आज 55 प्रवाशी घेऊन नांदेड येथून ट्रूजेट चे विमान मुंबईकडे रवाना झाले. नांदेड -मुबई विमानसेवा मराठवाड्यातील काही जिल्ह्यासह विदर्भातील निकटच्या जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्वाची ठरणारी आहे.
     सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने उडान योजनेच्या माध्यमातून देशभरातील लहान विमानतळ जोडण्याचा निर्णय घेतला. यात नांदेड विमानतळाचा समावेश होता.  पहिल्या टप्प्यात नांदेड- हैद्राबाद ही विमानसेवा सुरू झाली. मात्र धावपट्टीच्या कारणास्तव नांदेड-मुंबई विमानसेवा सुरू झाली नव्हती. धावपट्टीचे काम करण्यात आल्याने आज हैदराबाद-नांदेड-मुंबई ही विमास सेवा ट्रूजेट कंपनीने सुरू केली आहे.
      मुंबई येथून आज आलेल्या या विमानात प्रवाश्यांसह सिने अभिनेते जितेंद्र,राकेश रोशन,आदित्य पांचोली आदीं उपस्थित होते. नांदेड विमानतळावर या सर्व प्रवाश्यांचे तसेच सिनेकलाकारांचे गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर सिनेअभिनेते जितेंद्र,राकेश रोशन,आदित्य पांचोली आदींनी प्रसिद्ध अशा सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांचा गुरुद्वाऱ्याच्या वतीने शिरोपाव देऊन सत्कार करण्यात आला.
     यापूर्वी 2008 साली किंगफिशर कंपनीने विमानसेवा सुरू केली होती.त्यांनतर गो-एअर,स्पाइस जेट या कंपन्यांनी सेवा सुरू केली होती. आता ट्रूजेट कंपनीने आजपासून सेवा सुरू केली आहे. त्यामुळे कमी दरात विमान प्रवास करन्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता या विमानसेवेमुळे पूर्ण होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत भ्रष्टाचार-निलेश राणे

रत्नागिरी – रविवारी मुंबईत निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचेही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

क्वीन कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली – बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या बहुप्रतीक्षित ‘मणिकर्णिका; द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सध्या ते पुण्यात दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात पुण्यातील मेट्रो ३ चे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात येणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याणकरांकडून मोदींसाठी गाजराचे तोरण

कल्याण – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. एकीकडे भूमिपूजनासाठी येणाऱ्या मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात...
Read More