नांदेडात चोरीचे २३ लाख ८५ हजारांचे सोने जप्त – eNavakal
महाराष्ट्र

नांदेडात चोरीचे २३ लाख ८५ हजारांचे सोने जप्त

नांदेड – नांदेड शहरातील गोविंदराज ज्वेलर्समधून दुकानात काम करणाऱ्या एका महिलेने २३ लाख रुपये किंमतीचे सोने लंपास केले. या महिलेने चोरीचे हे सोने घरासमोरच खड्डा करुन पुरुन ठेवले होते. पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिच्याकडून चोरीतील सर्व सोने जप्त केले आहे.

वंदना विठ्ठलराव तांदळे (३९) असे महिलेचे नाव आहे. गेल्या दीड वर्षांपासून ही महिला गोविंदराज ज्वेलर्स येथे कामाला होती. या ठिकाणी दुकानातील प्रत्येकाकडे एक काऊंटर देण्यात आले आहे. येणा-या ग्राहकांना काऊंटरमध्ये असलेल्या डब्यातील सोने काढून दाखविण्याचे काम वंदना तांदळे यांच्याकडे होते. वंदना तांदळे हिने आपल्याजवळील पर्स सोन्याच्या डब्याजवळ ठेवली होती. सायंकाळी आपले काम आटोपल्यानंतर कॅरिबॅगमध्ये पर्ससह २३ लाख ८५ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा डबा टाकून ती दुकानाबाहेर पडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.

सायंकाळी दिवसभराच्या व्यवहाराची तपासणी केल्यानंतर काऊंटरमधील दागिन्यांचा एक डबा गायब असल्याचे दुकानमालक निलेश तापडीया यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, वंदना तांदळे यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी लगेच याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर २४ तासांच्या आत आरोपी वंदना तांदळे यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर त्यांनी घरासमोरील खड्ड्यात पुरुन ठेवलेले २३ लाख रुपये किमतीचे सोने पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी वंदना तांदळेविरोधात वजिराबाद ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

सीसीटीव्हीमुळे लागला आरोपीचा शोध
गोविंदराज ज्वेलर्सच्या तापडिया यांना सायंकाळी हिशेब करत असताना काऊंटरमधील दागिन्यांचा एक डबा गायब असल्याचे लक्षात येताच धक्का बसला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, वंदना तांदळे या कॅरिबॅगमध्ये डब्याच्या आकाराची वस्तू घेवून जात असल्याचे दिसून आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More