नांदेडात घरकुल योजनेतील शेतकरी अंतिम देयकाविना वंचित – eNavakal
अन्य महाराष्ट्र

नांदेडात घरकुल योजनेतील शेतकरी अंतिम देयकाविना वंचित

नांदेड – घरकुल पूर्ण होवून चार महिने उलटले तरी  १८०  घरकुलांच्या अंतिम देयकाची रक्कम अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात खेटे मारुन बेजार झाले आहेत.
    कच्च्या  कुडाच्या घरात राहणार्‍या पात्र लाभार्थ्यांची रमाई आवास, शबरी आवास, आदिम कोलाम व  इंदिरा आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना याअंतर्गत घरकुल योजनेसाठी निवड झाली. पहिला, दुसरा हप्ताही  मिळाला. बँक विलीनीकरणानंतर प्रधानमंत्री  आवास योजना व रमाई आवास योजनेच्या  जवळपास १८०  लाभार्थ्यांचे आयएफसी कोडमुळे घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही कुणाचा दुसरा, कुणाचा तिसरा, कुणाचा चौथा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर  जमाच झाला नसल्याने पक्क्या घरांचे स्वप्न पाहणारे लाभार्थी बँकेचे व पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे दरवाजे झिजवून बेजार झाले आहेत.‘साहेब… घरकुल पूर्ण झाले. घरकुलाची रक्कम मिळेल का?’  असा आर्त टाहो लाभार्थी फोडत आहेत. घरकुल मिळाल्याच्या आनंदाने इकडूनतिकडून जमवाजमव करुन घरकुलाचे हप्ते मिळणार या भरवशावर उसनवारीने पैसे काढणार्‍यांना  घरकुलाचे हप्ते थांबल्याने परतफेड करावी कशी? ही चिंता भेडसावू लागली आहे. उद्भवलेल्या  आयएफसी कोड दुरुस्त करुन पंचायत समितीच्या  खात्यावर  घरकुलाच्या  बांधकामापोटीची रक्कम जमा न झाल्यास आर्थिक अडचणीत सापडलेले लाभार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More