नांदेडातील पाणीपुरवठा कामावर चोरीचे पाईप; कंपनीला नोटीस – eNavakal
News महाराष्ट्र

नांदेडातील पाणीपुरवठा कामावर चोरीचे पाईप; कंपनीला नोटीस

नांदेड- चोरीचे पाईप वापरून पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या शासकीय कंत्राटदाराला नांदेडचे मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

6 मार्च पासून जुन्या नांदेड भागात सुरू असलेल्या अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 31 मध्ये पाणी पुरवठा योजनेची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या सुरु असलेल्या कामात पोलीसांनी दखल दिली आहे . सुरूवातीला 17 आणि नंतर जवळपास 200 पाईप इतवारा पोलीसांनी जप्त करून पोलीस ठाणे इतवारा येथे ठेवले. तेलंगणा राज्यातून चोरून आणलेल्या पाईपच्या माध्यमाने नांदेडच्या नवीन पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम सुरू आहे. या बातम्यांना वर्तमानपत्रांनी मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी दिली. या सर्व संदर्भांचा आधार घेऊन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत अनेक ठिकाणी काम सुरू असलेल्या सोहेल कन्स्ट्रक्शन ऍन्ड स्टिल वर्क या शासकीय कंत्राटदाराला मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी एक नोटीस जारी केली आहे. त्यात सोहेल कंन्स्ट्रक्शनला कार्यारंभासाठी दिलेला आदेश, करारनामा, प्रसार माध्यमांनी प्रसिध्द केलेल्या पाईप चोरीच्या बातम्या, पोलीस निरिक्षक इतवारा यांनी मनपाला पाठविलेले पत्र, काम स्थगितीसाठी दिलेली नोटी आणि मनपाने पाईप खरेदीसाठी दिलेले पत्र अशा 6 संदर्भीय विषयानुसार नोटीस जारी केली आहे.

सोहेल कन्स्ट्रक्शनला दिलेल्या नोटीसमध्ये पाईप खरेदीच्या बिलांची मागणी महानगरपालिकेने केली होती. त्यासाठी 3 दिवसांचा वेळ दिला होता. तो वेळ संपलेला आहे. तरी सोहेल कंपनीने कागदपत्र दिले नाहीत म्हणून पाईप चोरीबद्दलचा संशय जास्त वाढला आहे. प्रथमदर्शनी सुरू असलेले पाणी पुरवठा योजनेचे काम चोरीच्या पाईपमधून होत आहे. हे दिसत आहे. किंवा पाईप चोरीच्या आरोपास सोहेल कंपनीची मुकसंमती असल्याचे जाणवते. नियमानुसार पाईपची खरेदी झाली नसल्याचे स्पष्ट पणे जाणवत असल्यामुळे सोहेल कंपनीचे काम रद्द करून आतापर्यंत टाकलेले सर्व पाईप खोदून काढून चौकशीसाठी पोलीसांच्या ताब्यात का देण्यात येवू नये असा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि नगरपालिकेची झालेली मानहाणी आपण जबाबदार आहात असे गृहीत धरुन आपला ठेका रद्द करून आपल्या कंपनीचे नाव काळ्या यादीत का टाकण्यात येवू नये असा प्रश्न विचारला आहे. यासाठी 24 तासांचा वेळ कंपनीला देण्यात आला आहे.  या कामासंबंधीचे कोणतेही देयक दिले जाणार नाही अशी सुचना आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दीपक मानकरच्या अडचणीत वाढ! अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीस नकार

मुंबई – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येमुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेण्यास आज उच्च न्यायालयाच्या...
Read More
post-image
News देश

बांधकाम व्यवसायातील तोट्यामुळेदेखील भय्यू महाराज तणावात होते

इंदौर- भय्यू महाराज ऊर्फ उदयसिंह देशमुख आत्महत्येप्रकरणी चौकशीला वेग आला असून, पोलीस संबंधितांचे जबाब नोंदवून घेत आहेत. भय्यू महाराजांचे बांधकाम व्यवसायात करोडोंचे नुकसान झाले...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालघर पोटनिवडणूक खर्चाची 26 जूनला सुनावणी

वसई- पालघर लोकसभा पोटनिवडणूक नुकतीच पार पडली, आणि ह्या निवडणुकीचा गाजावाजा ही देशभर झाला, मात्र या निवडणुकीत खर्चाचा हिशोब आयोगाने दिलेल्या मर्यादेत झाले नसल्याने आत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

भिवंडीत अवैध मशिदीचे बांधकाम! बांबूची परांची कोसळली

भिवंडी- भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथील बहारे मदिना या मशिदीच्या गच्चीवरील संरक्षक कठड्याचे काम सुरू असताना भिंतीला बांधण्यात आलेली बांबूची परांची भिंतीसह अचानकपणे तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत...
Read More
post-image
क्रीडा देश विदेश

भारतीय ‘अ’ संघाचा दणदणीत विजय

लंडन – इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारतीय ‘अ’ संघाने लिस्टशायर संघाचा 281 धावांनी दणदणीत पराभव करून या दौर्‍यातील आपल्या दुसर्‍या विजयाची नोंद केली. भारतातर्फे पृथ्वी शॉ...
Read More