नांदेडहून आता दिल्लीसाठी सुरू होणार आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा – eNavakal
News महाराष्ट्र

नांदेडहून आता दिल्लीसाठी सुरू होणार आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा

नांदेड – प्रवाशांची मागणी लक्षात घेता नांदेडहून दिल्लीसाठी 19 नोव्हेंबर 2018 रोजी विमानसेवा सुरु करण्यात आली होती. ही सेवा आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार अशी सुरु आहे. यातच प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन नांदेडहून दिल्लीसाठी आणखी एक नवी फेरी दर शनिवारी सुरु करण्यात येणार आहे. यामुळे दिल्लीसाठी आता नांदेडकरांना आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा मिळणार असल्याचे नांदेड येथील एअर इंडिया स्टेशनचे व्यवस्थापक गजेंद्र गुठे आणि अजय भोळे यांनी सांगितले.
सचखंड गुरुद्वारामुळे देशाच्या विविध भागातून भाविकांचा नांदेडकडे दर्शनासाठी ओढा असतो. या बरोबरच वाढत्या उद्योगामुळे हैदराबाद, अमृतसर, मुंबई, दिल्लीसह चंदीगडला जाणार्‍या प्रवाशांची संंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावरुन मुंबई, दिल्लीसाठी विमानसेवा सुरु करण्याची शहरवासियांची मागणी होती. त्यातच आता नव्याने 8 जूनपासून नांदेड-दिल्ली-नांदेड अशी दर शनिवारसाठी नवी सेवा उपलब्ध होणार आहे. दर शनिवारी दिल्लीहून हे विमान दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुटेल व नांदेड येथे सायंकाळी 5 वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. पुन्हा नांदेडहून दिल्लीसाठी सदर विमान सायंकाळी 5.45 वाजता निघेल आणि रात्री 6 वाजून 35 मिनिटांनी दिल्ली येथे पोहोचेल. या प्रवासाचे सुरुवातीचे शुल्क हे 4 हजार 309 रुपये इतके असणार आहे. तर सदर विमानाची प्रवासी क्षमता 122 इतकी असून या विमानात आठ बिझनेस क्लास तर 114 इकॉनॉमिक क्लास उपलब्ध राहणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More