नांदेडमध्ये घरकुलांच्या लोकवाट्याची वसुली सुरु – eNavakal
महाराष्ट्र

नांदेडमध्ये घरकुलांच्या लोकवाट्याची वसुली सुरु

नांदेड – नांदेड शहरात बीएसयुपी लाभार्थ्यांकडील वाटा वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके स्थापन केली असून जवळपास ३० कोटींचा लोकवाटा बीएसयुपी लाभार्थ्यांकडे थकला आहे. हा वाटा वसुल  करण्यासाठी मोठे आव्हान महापालिकेपुढे उभे आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेपुढे उत्पन्न वाढविण्याचे मोठे आव्हान उभे आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत बंद पडल्याने आता उत्पन्न वाढवायचे कसे याबाबत प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात प्रामुख्याने मालमत्ताकराची वसुली, पाणीकराची वसुली याबाबत नियोजन केले जात आहे. दुसरीकडे शहरात बीएसयुपी योजनेअंतर्गत थकित असलेल्या लोकवाट्याची रक्कमही वसुल करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. उपायुक्त गीता ठाकरे यांच्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

२०११ मध्ये शहरात बीएसयुपी योजनेअंतर्गत १८ हजार ६७६ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत बहुतांश लाभार्थ्यांनी आपला हिस्सा भरलाच नाही. १२ हजार लाभार्थ्याकडून वाटा वसुल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बीएसयुपी लाभधारकाकडील वाटा वसुल करण्यासाठी महापालिकेने वसुली पथक स्थापन केले आहे. सहा वर्षापासून थकलेला हा वाटा वसुल करताना मनपापुढे आडचणी येत असल्या तरी लाभार्थ्याकडून टप्प्याटप्प्याने वसुली केली जाईल असे उपायुक्त ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.शहरातील जयभीमनगरात लोकवाटा वसुलीला प्रारंभ करण्यात आला आहे. शहरातील अन्य भागातही हे विशेष वसुली पथके लवकरच पोहोचतील. त्यातून लोकवाटा वसुल होईल. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना २८ हजार रुपये लोकवाट्यापोटी भरायचे आहेत. तर मागासवर्ग प्रवर्गातील लाभार्थ्याना २५ हजार रुपये भरायचे आहेत. जवळपास ३० कोटी रुपये या विभागाकडून अपेक्षित आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ न्यायालय महाराष्ट्र

‘माझ्या जीवाला धोका’! अजामिनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी हायकोर्टात

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 12 हजार 700 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी न्यायालयाने जारी केलेल्या...
Read More
post-image
महाराष्ट्र शेती

पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटांत

वाडा – पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे.भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#AsiaCup2018 बांगलादेशची दुसरी विकेट; नझमुल हुसेन बाद

दुबई – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असून, सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि आफगाणिस्तान यांच्यात लढती...
Read More
post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More