नांदेडमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षाची सक्तमजुरी – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

नांदेडमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षाची सक्तमजुरी

नांदेड – लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांनी सुनावली.
नांदेड जिल्ह्यातील दरेसरसम येथील आरोपी राम उर्फ अविनाश धावजी राठोड(२६) हा ५ मार्च २०१६ रोजी हिमायतनगर येथे दहावीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून परभणीस घेऊन गेला. त्यानंतर परभणी येथून चारचाकी वाहनाने पनवेल येथील मित्राच्या रूमवर नेऊन जबरदस्तीने पाच वेळा शारीरिक संबंध ठेवले. ८ मार्च २०१६ला पोलिसांनी पनवेल येथे आरोपी आणि पिडीत मुलीस ताब्यात घेतले. हिमायतनगर पोलिसात आरोपीविरुद्ध कलम ३६६, ३७६, कलम(४) बाललैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  सहाय्यक पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी या प्रकरणाचा तपास करून १२ मे २०१६ रोजी भोकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात ९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. अल्पवयीन मुलीची साक्ष, वैद्यकीय अहवालावरून आरोपी राम उर्फ अविनाश राठोडला दहा वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार रूपये दंड, दंडापैकी २५ हजार रूपये पिडीत मुलीस देण्याचा निकाल न्यायाधीश एम.एस.शेख यांनी दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश राजकीय

भाजपाच्या बंगालमधील 4 खासदारांसह 21 आमदार व नेते ममता बॅनर्जींच्या संपर्कात

कोलकाता – पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस सोडून...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापूरची मार्कंडेय महामुनींची रथयात्रा यंदा कोरोनामुळे रद्द

सोलापूर – दरवर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या नारळी पौर्णिमेनिमित्त पद्मशाली समाजाचे कुलदैवत असलेल्या सोलापुरातील मार्कंडेय महामुनींंची होणारी रथयात्रा यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली...
Read More
post-image
देश

भारत-पाक बॉर्डरचा राजा मुंबईहून रवाना

मुंबई – भारत-पाक सीमेवर वसलेल्या पूंछ गावी भारतीय आर्मी छावणीत मराठा रेजिमेंटसोबत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यंदाही मुंबईच्या कुर्ला विभागातील इंडियन नेव्ही बेस येथून श्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

अमरावतीच्या पेढी नदीत तिघे जण बुडाले, शोध सुरु

अमरावती – जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. यावेळी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेढी नदीच्या काठावर वसलेल्या आमला गावातील तीन व्यक्ती नदीत...
Read More
post-image
महाराष्ट्र

दारणाकाठमध्ये 9 बिबटे जेरबंद केल्यानंतर बिबट्याचा वावर सुरूच

नाशिक – दारणाकाठच्या शिवारात जुलै महिन्यात तब्बल 9 बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र अजुनही या भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. भगूर-राहुरी शिवारात...
Read More