नशिकच्या कॉलेजमध्ये घुसत उच्चशिक्षिताकडून प्राध्यापिकेचा विनयभंग – eNavakal
News गुन्हे

नशिकच्या कॉलेजमध्ये घुसत उच्चशिक्षिताकडून प्राध्यापिकेचा विनयभंग

नाशिक- एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयातील लॅबमध्ये शिरून उच्चशिक्षीत तरूणाने विवाहाची गळ घालत प्राध्यापिकेचा विनयभंग केला. ही धक्कादायक घटना आज गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात घडली. या घटनेमुळे कॉलेज वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतास गजाआड करण्यात आले आहे.आरोपी हाही उच्चशिक्षीत असल्याने हा विषय आज शहरात दिवसभर चर्चेचा विषय ठरला आहे.
योगेश जावळे असे आरोपीचे नाव असून तो मखमलाबाद नाका येथील रहिवासी आहे.जावळे याचे एका महाविद्यालयातील विवाहीत प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेम आहे. यातून त्याने प्राध्यापिकेचा मोबाईल नंबर मिळविला होता. अनेकदा संपर्क साधत तो प्राध्यापिकेकडे विवाहाची मागणी करत होता. त्रस्त झालेल्या प्राध्यापिकेने ही बाब महाविद्यालय प्रशासनाला सांगितली होती. या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने त्यास महाविद्यालयात बोलवत त्याची चांगलीच कान उघडणी केली होती. तरीही त्याची भीड चेपली नव्हती.आज तर त्याने हदच केली. प्राध्यापिका असलेल्या लॅबमध्ये घुसत योगेशने आपणास आता नोकरी लागली असल्याचे सांगत लग्न करण्याची गळ घातली. यावेळी प्राध्यापिकेने विरोध केला असता योगेशने खिशातील कुंकवाची पुडी काढून प्राध्यापिकेच्या कपाळावर कुंकू लावण्याचा प्रयत्न केला.ही बाब अन्य कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच ते प्राध्यापिकेच्या मदतीस धावून आले. योगेशने त्यानांही मारहाण केली. याप्रकरणी प्राध्यापिकेने सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी योगेशला गजाआड केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लॉकडाउन 4.0 : आता पुढे काय करणार? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली – देशात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लॉकडाउनच्या चारही टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
Read More
post-image
ट्रेंडिंग देश महाराष्ट्र

‘या’ विशाल चिखलात लपलेला जीव तुम्ही शोधू शकता का?

जगावर कोसळलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी शेकडो देश लॉकडाऊन असल्याने सध्या करोडो नागरिक आपापल्या घरातच आहेत. भारतातही मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More