नव्या पदवी अभ्यासक्रमाचे खासगी कॉलेजना स्वातंत्र्य – eNavakal
मुंबई शिक्षण

नव्या पदवी अभ्यासक्रमाचे खासगी कॉलेजना स्वातंत्र्य

मुंबई – कॉलेज अधिकाधिक स्वायत्त व्हावीत या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहेच. याचेच पुढचे एक पाऊल म्हणजे खासगी कॉलेजांना नवीन पदवी, पदविका अभ्यासक्रम तयार करून ते चालिवण्यास मुभा देण्यात आली आहे. यासाठी विद्यापीठाची स्वतंत्र संलग्नता घेण्याची आवश्यकता नसल्याचेही नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या परिनियमात स्पष्ट करण्यात आले आहे.

खासगी कॉलेजांनी काळानुरूप अभ्यासक्रम तयार करून ते सुरू करावेत यासाठी सरकारतर्फे प्रोत्साहन दिले जाते. यापूर्वी पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास या कॉलेजांना परवानगी होती. पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाची संलग्नता घेणे बंधनकारक होते. मात्र नवीन परिनियमानुसार पदवी अभ्यासक्रम कॉलेजांनी त्यांच्या अभ्यास मंडळाच्या बैठकीत मंजूर करून त्यानुसार सुरू करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हा अभ्यासक्रम तयार करताना सर्व नियमांचे पालन होणे बंधनकारक असणार आहे. कॉलेजांनी अभ्यासक्रम सुरू करत असल्याचे विद्यापीठाला कळविणे आवश्यक आहे. त्यानुसार विद्यापीठ अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना पदवी देऊ शकेल. मात्र, अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाची नव्याने संलग्नता घेण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी या प्रक्रियेत वेळ वाया जायचा. यामुळे अनेकदा शेवटची परीक्षा संपली तरी अभ्यासक्रमांना मान्यताच मिळालेली नसायची. खासगी कॉलेज अधिक सक्षम करण्यासाठी परिनियमात नवीन विद्यापीठ कायद्यानुसार आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More