नव्या आर्थिक वर्षात हृदयविकारावरील उपचारही महागले – eNavakal
आरोग्य देश

नव्या आर्थिक वर्षात हृदयविकारावरील उपचारही महागले

नवी दिल्ली – १ एप्रिलपासून हृदयविकारावरील उपचार महागले आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग आॅथॉरिटीने जाहीर केलेल्या निर्णयानुसार हृदय शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेंटसाठी १ एप्रिलपासून जवळपास १,२00 रुपये जास्त मोजावे लागत आहेत. व्यायामाचा अभाव, बदललेली जीवनशैली, ताण इत्यादींमुळे हृदयरोगाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हृदयविकारात रक्तदाबासारखी कायमस्वरूपी व्याधी निर्माण होते. तसेच हृदयात ब्लॉकेजेस निर्माण होऊन हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. त्यावर तातडीचे उपचार म्हणून केल्या जाणाऱ्या अँजिओप्लास्टीवेळी स्टेंट बसविण्यात येतात. नव्या आर्थिक वर्षांत हे स्टेंट महाग झाले आहेत. त्यांच्या किंमती ४.२६ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More