नवे सरकार भाजपाचेच असेल – देवेंद्र फडणवीस – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

नवे सरकार भाजपाचेच असेल – देवेंद्र फडणवीस

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी सव्वा चार वाजता राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर सह्याद्री सभागृहात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेकडून सतत होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच नवे सरकार भाजपाचेच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणले, महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला. मात्र धक्का याचा बसला की, पूर्ण महायुतीला जनतेने जनादेश दिलेला असताना निकालाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. असे वक्तव्य केले. खरंतर अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झालाच नव्हता. याबाबत पहिल्यांदा झालेली चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा झालेल्या चर्चेत निर्णय झाला नव्हता. त्यामुळे मी ‘अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं ठरलं नव्हतं’, असं बोललो. निवडणुकीनंतर पंधरा दिवस हा विषय चर्चेतून सोडवता आला असता, मात्र चर्चा शिवसेनेने थांबविली. मी स्वत: उद्धव ठाकरेंना अनेक फोन केले. परंतु त्यांनी एकही फोन घेतला नाही. आमच्याकडून चर्चेची दारे खुलीच होती. पण वाईट एकाच गोष्टीचे वाटले की आमच्याशी चर्चा करायला त्यांना वेळ नव्हता. परंतु ज्यांच्यावर टीका करून विधानसभा निडणूक लढली. त्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना दिवसांतून त्यांना तीन तीन वेळा भेटायला वेळ होती.

‘भूतकाळात भाजपा आणि शिवसेनेने अनेक विधानसभा निवडणुका विरोधात लढल्या मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर नाहीच परंतु उद्धव ठाकरेंवरही अशा शब्दांत टीका केली नाही. या १५ दिवसांत शिवसेनेने सामनातून टीका केलीच मात्र वक्तव्यातूनही खालच्या दर्जाची टीका केली. आम्हीही अशी टीका करू शकलो असतो, आणखी वरच्या भाषेत उत्तर देऊ शकलो असतो. मात्र आम्हाला ते शोभत नाही’, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच भाजपा फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, असे आश्वासन देत त्यांनी ‘ज्या पक्षांकडून आमच्यावर फोडाफोडीच्या राजकारणाचे आरोप लावण्यात आले त्यांनी पुरावे सादर करावे, नाहीतर आमची माफी मागावी’, असे खुले आवाहन फडणवीस यांनी केले. तसेच भारतीय जनता पार्टीच पुन्हा सत्तेवर येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

Live राजकीय घडामोडी

१५.३० – राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव १५.०० – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस १४.४९ – राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More