नवी मुंबई मध्ये टायफॉइडचे पाच हजार रुग्ण – eNavakal
News आघाडीच्या बातम्या आरोग्य

नवी मुंबई मध्ये टायफॉइडचे पाच हजार रुग्ण

नवी मुंबई – शहरातील अस्वच्छतेमध्ये नवी मुंबई शहरात विविध आजार बळावत असल्याची माहिती समोर आली आहे. शहरात सुमारे पाच हजार टायफॉइडचे रुग्ण आढळून आल्याने आता नवी मुंबई मनपा आरोग्य खात्याळा उशिराने जाग आली आहे. टायफॉइड लसीकरण मोहीम मनपाने हाती घेतली असून शहरातील या आजारावर नियंत्रण आणयाचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य विभागाने सुमारे चार लाख बालकांना लस येत्या १४ जुलैपासून शहरातील सर्व आरोग्य केंद्रावर सुट्टीच्या दिवशी देण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक पातळीवर हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा महापौर जे.डी.सुतार आणि आयुक्त रामस्वामी यांनी केला आहे. मात्र अचानक या रुग्णाची संख्या पाच हजार इतकी वाढल्याची कबुली आरोग्य प्रशासनाने दिल्यावर याचे खापर मात्र वैयक्तिक सफाईवर आयुक्तांनी फोडले आहे.  या मोहिमेमध्ये शहरातील ९ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना आता लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून एक लाख सबंधित कंपनी मोफत देणार असून तीन लाख लस मनपा सहा कोटी रुपये खर्चून देणार आहे. मात्र या मोहिमेला आरोग्य खात्यातील काही अधिकाऱ्यांनी नकार घंटा दाखवली असल्याने अचानक टायफॉइड विभागाचा कारभार बघणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या जागेवर या मोहीम राबविण्याची जबाबदारी मर्जीतील अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. टायफॉइडवरील उपचार महागडे असल्याने मनपा मोफत लसीकरण राबवित असल्याचा दावा करत असून यासाठी शेकडो प्रशिक्षित कर्मचारी १४ जुलै पासून मोहीम राबवणार आहेत. २३ ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्यात दोन लाख व त्यानंतर पुढील वर्षी दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. सुमारे १७ लाख बालकांना या लस देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News अपघात

दर्शनावरून परतणार्‍या भाविकांच्या कारला अपघात ! 8 जखमी

महागाव – माहुर येथुन देवदर्शन करून परत येणार्‍या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. अपघातात 3 महिला गंभीर जखमी झाल्या असून पाचजण किरकोळ जखमी...
Read More
post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई –  ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत मुंबईसह राज्यभरातील गणपती बाप्पाला निरोप...
Read More