नवी मुंबई फेरीवाल्यांच्या मदतीला मुंबईची रसद – eNavakal
News मुंबई

नवी मुंबई फेरीवाल्यांच्या मदतीला मुंबईची रसद

नवी मुंबई – फेरीवाल्यांच्या मुद्दा आता गंभीर बनत चालला आहे. फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी मनपा सरसावली असताना आता फेरीवाल्यांच्या नावाखाली दुकान थाटून बसलेल्या नेत्यांना चांगलाच झटका बसणार आहे.नवी मुंबई आणि मुंबई मधील फेरीवाला संघटना नेत्यांनी हातमिळवणी करून एकमेकांना रसद पुरविण्यासाठी हालचाल सुरू केली आहे.
नवी मुंबई मनपाने शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी सुरुवात केली आहे.यासाठी एक संस्थेला काम देण्यात आले आहे.ही संस्था रस्त्यावर पथारी मांडलेल्या फेरीवाल्यांच्या सर्व्हे करणार आहे.या सरसकट सर्वेला फेरीवाला संघटनांनी विरोध केला आहे.आधी जागा निश्चित करून सर्व्हे करावा असा आग्रह आपल्या संघटनांचे अस्तित्व टिकविण्यासाठी धरला आहे.याला मनपा प्रशासनाने विरोध करत आधी सर्व्हे करून मग जागा निश्चित करण्याची भूमिका घेतली आहे.मनसेच्या आक्रमक भूमिकेचा भांडवलावर आता नवी मुंबई मधील चार ते पाच फेरीवाला संघटना एकत्र आल्या असून या संघटना आता मुंबईच्या मदतीला जाणार आहेत.वंदना शिंदे यांनी मुंबई मध्ये फेरीवाल्यांच्या मदतीसाठी मोर्चाचे नियोजन केले आहे.या आंदोलनात नवी मुंबई मधील फेरीवाला व्यावसायिक सहभागी होणार आहेत.या बदल्यात मुंबईच्या संघटना नवी मुंबई साठी मद्रतीची रसद पुरवणार आहेत.या मोर्चावर मनसे हल्ला करेल असा आरोप करत थेट पोलिसांकडे सरांक्षण प्रफुल्ल म्हात्रे यांनी मागितले आहे.नवी मुंबई पोलिसांना तश्या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे . नवी मुंबई मधील फेरीवाला संघटना सर्वेक्षण करण्यासाठी विरोध करत आहे.यासाठी आता मुंबईमधील फेरीवाल्यांची मदत घेतली जाणार आहे .याबाबत नुकतीच सिबिडी येथे शुक्रवारी बैठक घेवून यावर शिक्कमोर्तब करण्यात आले आहे.सध्या सर्वपक्षीय नेत्यांच्या संघटना आहे.मात्र राजकीय नेत्यांना दूर ठेवून आता हे फेरीवाला एकत्र आले आहेत. मनपविरोधात हे फेरीवाले एकजूट दाखवून सर्वेक्षण हाणून पाडायचे आणि अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध करायचा यासाठी आता हे एकत्र आले आहेत.परिणामी आता फेरीवाला विरोधात मनसे मनपा असा वाद आणखी चिघळणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More