नवी मुंबईकर रविवारी मेगाब्लॉकमुळे होणार हैराण – eNavakal
मुंबई वाहतूक होम

नवी मुंबईकर रविवारी मेगाब्लॉकमुळे होणार हैराण

मुंबई – नवी मुंबईकरांसाठी रविवार अडचणीचा ठरणार आहे. कारण, उद्या मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते मानखुर्द दरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. तर ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. या काळात रेल्वेसेवा खंडीत राहिल. त्यामुळे या काळात नवी मुंबईत पोहोचण्यासाठी किंवा नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी तुम्हाला रस्ते मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

शिवाय हार्बर मार्गावरील पनवेल ते अंधेरी ही सेवाही या काळात बंद राहिल. यामुळे नवी मुंबईकरांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवरही कल्याण ते ठाणे दरम्यान स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात स्लो मार्गावरची वाहतूक फास्ट मार्गावर वळवण्यात येईल. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा या स्थानकात थांबणार नाहीत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आज पहिला गुरुवार

विक्रमगड – शनिवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात अनेकांच्या घरात उपवास केला जातो व श्रावण महिन्याप्रमाणेच मास,मच्छी या महिन्यात वर्ज्य केली जाते.या...
Read More