नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नापास करता येणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण

नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नापास करता येणार

मुंबई – आता शाळेतील मुलांना अभ्यासात टंगळमंगळ करता येणार नाही. आतापर्यंत परीक्षा न देता दहावीपर्यंत पोहोचणार्‍या विद्यार्थ्यांना आता दरवर्षी प्रत्येक इयत्तेची परीक्षा द्यावी लागणार आहे. कारण परीक्षा न देता किंवा नापास होऊनही पुढच्या इयत्तेत जाण्याची संधी यापुढे मिळणार नाही. आता केंद्र सरकारने ‘शिक्षण हक्क कायद्यात’ सुधारणा केली आहे. त्यामुळे 2019-20 च्या नवीन शैक्षणिक वर्षापासून दरवर्षी प्रत्येक इयत्तेची परीक्षा होणार आहे. तसेच शाळेला ‘ढ’ विद्यार्थ्यांना नापासही करता येणार आहे. आता धम्माल मस्ती-मजा आणि खेळणे-बागडणे याला परीक्षेचे ग्रहण लागले आहे.
आपल्या महाराष्ट्रासहीत सर्व देशभर 2009 च्या शिक्षणहक्क कायद्यानुसार पाचवी आणि आठवी परीक्षा नापास झाल्यावरही दहावीत प्रत्येकाला प्रवेश मिळत असे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करीत नसत. पालकही सुट्टीच्या काळात मुलांचा अभ्यास न घेता सहलीला जात असत. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती घटली. काही विद्यार्थी दहावीत असले तरी त्यांना आठवीचा अभ्यासही नीट येत नसे. त्यामुळे सर्व शाळा प्रचंड तणावाखाली होत्या. शाळेचा टक्का घसरू नये म्हणून त्या ‘ढ’ विद्यार्थ्यांसाठी जादा तास अभ्यासाची उजळणी घेत असत. या तारेवरच्या कसरतीमुळे व टक्का सांभाळण्याच्या धास्तीमुळे शाळेतील शिक्षक वर्ग प्रचंड तणावाखाली होता. आता या तणावातून या शाळांची सुटका होणार आहे.
नापास होऊनही आणि अभ्यास न करताही विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याच्या या शिक्षण पद्धतीला काही जागरूक पालकांचाही विरोध होता. ज्या पालकांना आपल्या मुलांना डॉक्टर किंवा इंजिनीअर करायचे आहे, ते पालक ‘विनापरीक्षा पुढील कक्षा’ याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. सरकारने शिक्षणाचा दर्जा न सुधारता नापास न करण्याची जी पद्धत सुरू केली होती. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा संपूर्ण देशभर घसरला होता. म्हणूनच केंद्र सरकारने ‘शिक्षण हक्क कायद्यात’ सुधारणा करावी व नापासांना पुढच्या वर्गात ढकलण्याची पद्धत थांबवावी, याकरिता महाराष्ट्रासहीत 24 राज्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने या 2009 च्या कायद्यात सुधारणा करून विद्यार्थ्यांना नापास करण्याचा अधिकार शाळा चालकांना दिला. महाराष्ट्र सरकारबरोबरच महाराष्ट्रातील मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांनी ही मागणी केली होती. त्यामुळे कायद्यात सुधारणा झाली. आता 8 वर्षांपासून थांबलेल्या प्रत्येक इयत्तेच्या परीक्षा पुन्हा दरवर्षी सुरळीत होणार! तेव्हा आळस झटका व अभ्यासाला लागा!

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई – आजपासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागणार आहेत. ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने महापालिकेच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली इमारतीतील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More