नवाब मलिक यांच्या विरोधातील गिरीश बापट यांचा खटला मागे – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

नवाब मलिक यांच्या विरोधातील गिरीश बापट यांचा खटला मागे

पुणे – तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याविषयी एक विधान केले होते. बापट यांनी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी दिली आणि दोन हजार कोटींचा घोटाळा केला असा आरोप मलिक यांनी लावला होता. यानंतर मलिक यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. आज बापट यांनी हा खटला मागे घेतला आहे. न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

दोन हजार कोटींचा घोटाळा केल्यामुळे बापट हे भ्रष्टाचारी असल्याचे एक ना अनेक आरोप मलिक यांनी लावले होते. अन्न व नागरी पुरवठातर्फे तूर डाळीची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्याकडून डाळ जप्त केली होती. त्यानंतर डाळीचा लिलाव करण्यात आला. दरम्यान बापट यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. जाहीर आरोप केल्याने माझी बदनामी केली जात आहे असे बापट यांनी त्यावेळी सांगितले आणि मानहानीचा दावा न्यायालयात दाखल केला होता. आता बापट यांनी दावा मागे घेतला असला तरी माझे आरोप अजून कायम आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ न्यायालय महाराष्ट्र

‘माझ्या जीवाला धोका’! अजामिनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी हायकोर्टात

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 12 हजार 700 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी न्यायालयाने जारी केलेल्या...
Read More
post-image
महाराष्ट्र शेती

पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटांत

वाडा – पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे.भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#AsiaCup2018 बांगलादेशची दुसरी विकेट; नझमुल हुसेन बाद

दुबई – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असून, सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि आफगाणिस्तान यांच्यात लढती...
Read More
post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More