नवाब मलिक यांच्या भावाची दादागिरी; कामगारांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल – eNavakal
मुंबई

नवाब मलिक यांच्या भावाची दादागिरी; कामगारांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या प्रभागात वर्क ऑर्डरशिवाय काम सुरू असल्याच्या कारणावरून कामगारांना ही मारहाण केल्याचे लक्षात आले. मात्र हा व्हिडिओ १ महिन्यांपूर्वीच असल्याचे बोललं जात आहे.

कुर्ला येथे रस्त्याचे काम सुरू होते. येथे चार कामगार पाईपमध्ये वायर टाकण्याचे काम करत होते. यावेळी कामगारांकडे कामाच्या ऑर्डरची मागणी केली असता कामगारांनी ती दाखवली नाही. त्यानंतर मलीक यांनी त्यांना मारहाण केली. दरम्यान, तो खासगी ठेकेदार होता. महापालिकेचे नुकसान करत होता. त्याला या आधीही समजावले होते. त्यांना विनंती करून काम थांबवण्यास सांगितले. ते कामगार परवानगीशिवाय काम करत होते. तसेच ते दादागिरीने काम करत होते. त्यांची दादागिरी थांबवण्यासाठी मला हे पाऊल उचलावले लागले, असे कप्तान मलिक म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
गुन्हे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई राजकीय

‘मुंबई पोलिसांची सुरक्षा घेऊन त्यांच्यावरच नीच आरोप?’ शिवसेनेकडून अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकारणही चांगलंच तापत आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनसे नेते अविनाश जाधव यांचा जामिन अर्ज फेटाळला

ठाणे – परिचारिकांसाठी वसई महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केल्याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्याने त्यांना...
Read More
post-image
महाराष्ट्र

शिवसेनेला हिंदूत्व व सामाजिक बांधिलकीचा विसर, दरेकरांचा हल्लाबोल

खेड – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदूत्वाचा जाज्वल्य विचार केला होता. शिवसेनेने हिंदूत्वावर अनेक निवडणूकाही लढविल्या. पण सध्या सत्तेसाठी शिवसेनेला हिंदूत्वाचा विसर पडलेला...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊतांचा भाजपासाठी फिल्मी डायलॉग, म्हणाले…

मुंबई –  ‘जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते… समझनेवालों को इशारा काफी है,’ अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर...
Read More
post-image
देश राजकीय

भाजपाच्या बंगालमधील 4 खासदारांसह 21 आमदार व नेते ममता बॅनर्जींच्या संपर्कात

कोलकाता – पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस सोडून...
Read More