नवाझ शरीफांची प्रकृती ढासळली – eNavakal
विदेश

नवाझ शरीफांची प्रकृती ढासळली

लाहोर – पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले माजी पंतप्रधान नबाझ शरीफ यांची प्रकृती ढासळत चालली आहे. तरीही तुरुंग प्रशासक शरीफ यांची विशेष तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करू देत नसल्याचा आरोप त्यांची कन्या मरियम शरीप यांनी केला आहे. मरियम शरीफ म्हणाल्या की, अजीजिया स्टील मिल भ्रष्टाचारप्रकरणी नवाझ शरीफ यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण शिक्षा भोगत असलेले शरीफ यांच्या डाव्या बाजूचे अंग दुखत आहे. त्यांना हृदयरोग असून त्यांच्या डाव्या बाजूच्या संपूर्ण शरीराच्या भागामध्ये वेदना होत आहे. मात्र तुरुंगाचे प्रवक्ते सांगत आहेत की, आम्ही त्यांची विशेष डॉक्टरांकडून तपासणी केली असता ते ठीकस्थितीत आहेत.
मरियम यांनी ट्विट केपले आहे की, शरीफ यांचे हृदयरोगतज्ज्ञ दिवसभर तुरुंगात जाऊन शरीफ यांची तपासणी करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यांना तुरुंगात सोडले जात नव्हते. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करणे फार गरजेचे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More