नरेंद्र मोदी ‘दुबळे’ पंतप्रधान; राहुल गांधींचे टीकास्त्र – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

नरेंद्र मोदी ‘दुबळे’ पंतप्रधान; राहुल गांधींचे टीकास्त्र

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ला घडणाऱ्या ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावात चीनने खोडा घातला. याच मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. कमकुवत मोदी हे शी जिनपिंगना घाबरले. भारताविरुद्ध कृती करणाऱ्या चीनविरुद्ध मोदींच्या तोंडून चकार शब्दही निघाला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात फेटाळण्यात आला. बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे चीनने पुन्हा एकदा नकाराधिकारचा वापर केला. त्यामुळे मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा भारताचा प्रयत्न चौथ्यांदा अपयशी ठरला आहे. चीनने कायमच मसूदला पाठिशी घातले आहे. २००९, २०१६ आणि २०१७मध्ये या संदर्भातील प्रस्तावावर चीनने नकाराधिकाराचा वापर करत खोडा घातला होता. यावरून राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे मोदींवर निशाणा साधला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More