नदी संवर्धनासाठी देवेंद्र सरकारची मुंबई रिव्हर अँथम मार्फत जनजागृती – eNavakal
News मनोरंजन मुंबई होम

नदी संवर्धनासाठी देवेंद्र सरकारची मुंबई रिव्हर अँथम मार्फत जनजागृती

मुंबई –  नदी संवर्धनासाठी देवेंद्र सरकार मोठ्या प्रमाणात एका अँथमसह जनजागृती करत आहे. या जनजागृतीसाठी ‘मुंबई रिव्हर अँथम’ ह्या व्हीडीओची निर्मिती करण्यात आली आहे.. या रिव्हर अँथममधील ‘स्टारकास्ट’ सध्या भलताच चर्चेचा विषय ठरत आहे. यु-ट्यूबवर हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या गाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून अमृता फडणवीस यांनी अनेक उपक्रमांच्यानिमित्ताने आपल्या सुरेल आवाजाचा प्रत्यय उभ्या महाराष्ट्राला करून दिला होता. अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी हे रिव्हर अँथम गायले आहे. याशिवाय, या अँथममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधार मुनगंटीवार, मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता आणि अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी अभिनय केला आहे. मुंबईत पूर्वीच्या काळी असणाऱ्या नद्या आणि सध्या त्यांचे होत असलेले प्रदूषण यावर ‘रिव्हर अँथमच्या’मधून प्रकाश टाकण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More
post-image
News विदेश

पाकिस्तानविरोधात आता अफगाणिस्तानही सरसावला

नवी दिल्ली- काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानातून रसद आल्याचे पुढे आल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संताप आहे. पाकिस्तानविरोधात असाच संताप दुसरे शेजारी इराण आणि अफगाणिस्तान...
Read More