नदीत आंघोळीसाठी गेलेल्या पिता-पुत्राचा बुडून मृत्यू – eNavakal
News महाराष्ट्र

नदीत आंघोळीसाठी गेलेल्या पिता-पुत्राचा बुडून मृत्यू

सिंधुदुर्ग -उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी आलेले महेश चंद्रकात वेदरे व मुलगा मयूर महेश वेदरे घरापासून काही अंतरावर असलेल्या नदीत आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी त्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मालवणमधील श्रावण गावात घडली आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी आलेले महेश चंद्रकात वेदरे व मुलगा मयूर महेश वेदरे घरापासून काही अंतरावर असलेल्या नदीत आंघोळीसाठी गेले होते. यावेळी महेश यांच्या बहिणीने त्यांना पाण्यात पुढे न जाण्याची सूचनाही केली. ती कपडे धुण्यात मग्न होती. त्यावेळी नेमके हे दोघे कसे बुडाले ते तिला कळले देखील नाही. तिने समोर पाहिले असता. भाऊ महेश व मयूर दिसले नाही.
त्यामुळे तिने मोठमोठ्याने हाका मारल्या. मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने तिला दोघे बुडाल्याचा संशय आला. ती मोठमोठ्याने मदतीसाठी हाका मारत जवळ असलेल्या घराच्या दिशेने धावत सुटली आणि नदीत उतरलेले ते दोघे दिसत नसल्याचे तिने गावकर्‍यांना सांगितले. त्यानंतर स्थानिकांनी धावाधाव करत दोघांना नदीत शोधण्याचा प्रयत्न केला. काही काळाने महेश व त्यांचा मुलगा मयूर हे मृत अवस्थेत आढळून आले. ते मूळचे श्रावण गावचे निवासी महेश नोकरीनिमित्त मुंबईत राहत होते. आठ दिवस गावात राहून ते पुन्हा मुंबईला परतणार होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई – मुंबईतील खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More