‘नथुराम गोडसे देशभक्त’ वक्तव्याबाबत साध्वी प्रज्ञाने मागितली माफी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

‘नथुराम गोडसे देशभक्त’ वक्तव्याबाबत साध्वी प्रज्ञाने मागितली माफी

नवी दिल्ली – महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणवणाऱ्या भाजपा उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. काल रात्री १ वाजता ट्विट करून त्यांनी लिहिले, ‘मी नथुराम गोडसेसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत जनतेची माफी मागते, माझं विधान पूर्णपणे चुकीचं होतं. माझ्या मनात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींबाबत आदर आहे.’

दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी जामिनावर सुटलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर या भाजपाकडून भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. गुरुवारी प्रचारादरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांना अभिनेता कमल हसन यांनी नथुराम गोडसेसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या उत्तरल्या, ‘नथुराम गोडसे देशभक्त होता, आहे आणि राहील.’ त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More