नक्षलवादी संघटनेशी संबंधित आरोपींचा जामीन अर्ज; २७ सप्टेंबरला सुनावणी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

नक्षलवादी संघटनेशी संबंधित आरोपींचा जामीन अर्ज; २७ सप्टेंबरला सुनावणी

पुणे – मागील वर्षी ३१ डिसेंबर रोजी पुण्यातल्या शनिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकार घडला. यादरम्यान पोलिसांनी तपास करत असताना  अॅड. सुरेंद्र गडलिंग आणि प्रा. शोमा सेन यांना अटक केली होती. बंदी असलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही अटक केली होती. यानंतर दोघांनी शुक्रवारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आता २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

सध्या या दोघांशिवाय महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन हे देखील अटकेत आहेत. यापूर्वी ७ सप्टेंबरला पुणे न्यायालयाने सरकारी पक्षाला त्यांची बाजू मांडण्यासाठी मुदत दिली होती. यावरच आज सुनावणी झाली. पुढील सुनावणी ही २७ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More