नक्षलवादाविरोधात मोठी कारवाई! जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला पतीसह बेड्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

नक्षलवादाविरोधात मोठी कारवाई! जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला पतीसह बेड्या

गडचिरोली – जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला पती किरण कुमार इलियाससह बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नर्मदाक्का ही नक्षलवादी चालवळीच्या सेंट्रल कमिटीची सदस्या असून गेल्या २७ वर्षांपासून नक्षलवादी चळवळीत सक्रीय आहे. त्यामुळे ही अटक नक्षलवादाविरोधातील मोठी कारवाई समजली जात असून तेलंगणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

६२ वर्षीय नर्मदाक्का ३० वर्षांहून अधिक काळ जंगलात राहिलेली असून ती कुख्यात नक्षली असली तरी तिला सातहून अधिक भाषा बोलता येतात. तिने वेगवेगळ्या ठिकाणी शहरांत काम केलेले आहे. मूळची आंध्रप्रदेशची असलेल्या नर्मदक्काचे शिक्षणही तिथेच झाले. साल २०१२ मध्ये ती चकमकीत मेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, मात्र ती जिवंत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई हाती घेतल्यानंतर ती अतिशय आजारी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक हो किंवा आत्मसमर्पण कर, असे आदेश दिले होते. अखेर तिला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. तिचा पती हा लग्नापूर्वी आंध्रप्रदेशमध्ये सरकारी नोकरी करत होता. मात्र नक्षलवाद या दोघांच्याही मनात इतका प्रचंड होता की तोदेखील तिच्यासह सरकारी नोकरी सोडून या चळवळीत सक्रीय झाला.

गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांकडून सातत्याने मोठमोठे जीवघेणे हल्ले केले जातात. या नक्षलवाद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्या कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या नर्मदाक्काला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तिच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळेल आणि नक्षलवादविरोधी कारवाईला गती मिळेल, अशी शक्यता आहे.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

होर्डिंग लावल्याने कोणाला तिकीट मिळत नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा होर्डिंग लावण्याचा सपाटा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या होर्डिंगमुळे...
Read More