नंदुरबार महापालिकेच्या सभेत काँग्रेस-भाजपा नगरसेवकांत राडा – eNavakal
News महाराष्ट्र

नंदुरबार महापालिकेच्या सभेत काँग्रेस-भाजपा नगरसेवकांत राडा

भाजपाच्या 2 नगरसेवकांना मारहाण, भाजपा नगरसेविकेचा पती रक्तबंबाळ

नंदुरबार – नंदुरबार नगरपालिकेच्या सभेत विषय मंजुरीवरून चाललेल्या वादावादीचे रुपांतर अचानक हाणामारीत झाले. काँग्रेस आणि भाजपा नगरसेवकांमध्ये राडा झाला. यामुळे पालिकेत काही काळ तणाव निर्माण झाला होता. या हाणामारीत एका नगरसेविकेचा पती रक्तबंबाळ झाला असून दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद नोंदवायला पोलीस ठाणे गाठले होते.
नंदुरबार नगरपालिकेची आज सकाळी 11 वाजता सभा सुरू झाली. तेव्हा पुढे बसायला मिळावे यावरून भाजपा नगरसेवकांनी मुद्दा उपस्थित केला. नंतर भाजपा नगरसेवक आनंद माळी, निलेश माळी, नगरसेविका संगिता सोनवणे यांनी  अजेंड्यावर लोकांच्या कामाशी संबंधीत विषय नसतात, असे म्हणणे लावून धरले. तसेच सर्व भाजपा नगरसेवकांनी आमचे म्हणणे मान्य होईपर्यंत खाली बसणार नाही, अशी भूमिका घेतली. या गदारोळात नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी बसून बोलण्याची विनंती करीत चर्चा चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे नगरसेवक किरण रघुवंशी आणि भाजपाचे माळी यांच्यात वाद वाढून अचानक खूर्ची फेकणे, धावपळ सुरू होवून दोन्ही गट हमरीतुमरीवर आले. नगरपालिका परिसरात क्षणात दंगल सदृश्य वातावरण बनले. पोलिसांनी हलका लाठीमार करून दोन्ही गटाच्या समर्थकांना पांगवले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More