धोनी शोधणार तुमच्या आयुष्याचा जोडीदार – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

धोनी शोधणार तुमच्या आयुष्याचा जोडीदार

नवी दिल्ली – आता तुमच्या आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी चक्क भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी तुम्हाला मदत करणार आहे. कारण धोनी आता ऑनलाईन पद्धतीने लग्न जुळवणाऱ्या ‘भारत मॅट्रीमोनीचा ब्रँड अॅम्बिसिडर’ झाला आहे. लवकरच टेलिव्हिजन, प्रिंट, रेडीओ, होर्डिंग इत्यादींवरील भारत मॅट्रीमोनीच्या जाहिरातींमध्ये धोनी दिसेल.

‘मी एका अशा ब्रँडशी जोडलो आहे ज्याने अनेक लग्न यशस्वीरित्या जुळवली आहेत’, असे म्हणत धोनीने आनंद व्यक्त केला. तसेच या वेबसाईटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगवेल जानकीरमन यांनी सांगितले, ‘धोनी अनेक तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहे त्यामुळे ब्रँड अॅम्बिसिडर म्हणून त्याची निवड करणे हा योग्य निर्णय आहे, धोनी आमच्याबरोबर जोडल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे.’

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More