धोनीचा ‘हा’ खतरनाक स्टंट; तुम्ही ट्राय केलात का? – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

धोनीचा ‘हा’ खतरनाक स्टंट; तुम्ही ट्राय केलात का?

रांची – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशात परतल्यानंतर सोशल मीडियावर अधिकच चर्चेत आहे. कर्णधार म्हणून असो की उत्तम फिनिशर धोनीने नेहमीच स्वत:ची छाप सोडली आहे. पण धोनी यावेळी त्याने केलेल्या खतरनाक स्टंटमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. धोनीने आता सायकलवर केलेला स्टंट शेअर केला आहे आणि त्याने सर्वाना हा स्टंट करण्याचे आवाहन केले आहे.

Just for fun, plz try it at home.

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

धोनीने शेअर केलेल्या या व्हिडिओत तो घराच्या लॉनबाहेर एका सायकलवर बसला आहे. सायकलच्या कॅरिअरला एक लोखंडी फ्रेम जोडलेली आहे. रिमझिम पावसात डोळ्यावर गॉगल लावून, कानात हेडफोन्स घालून उतारावरून माही येत आहे. यावेळी त्याने आपल्या तोंडातही एक पट्टी धरलीय. उतारावरून सायकलवर बसून खाली येताना त्याचे हेडफोन्स त्याच्या डोळ्यावर येतात आणि तो हा स्टंट थांबवतो. कॅप्टन कूलचा हा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये शूट करण्यात आला आहे. ‘हा व्हिडिओ केवळ मनोरंजन करण्याच्या उद्देशाने बनवला असून, तुम्ही आपल्या घरी हे जरूर करून पाहा’ असेही आवाहन धोनीने केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको

जयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम

नवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...
Read More