धुळे महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

धुळे महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

धुळे – भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी वेगळी चूल मांडल्यावर राज्यभर चर्चेत असलेली धुळे महानगरपालिकेची निवडणूक उद्या होणार आहे.  या निवडणुकीसाठी 450 बूथवर मतदान होणार आहे. त्यातील 120 मतदान केंद्र संवेदनशील तर 19 मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.

भाजपमधील अंतर्गत वादामुळे येथील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.  या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त येथे ठेवण्यात आला आहे. व्हिडीओ कॅमेऱ्यासोबतच ड्रोन कॅमेराने देखील मतदान केंद्रावर नजर ठेवण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी एक पोलीस अधीक्षक, एक पोलीस अधिकारी, 4 डीवायएसपी, शंभर अधिकारी आणि दीड हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे.

धुळे महानगरपालिकेत 74 जागा आहेत. यापैकी 73 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यातील एक जागा बिनविरोध  झाली आहे. प्रभाग 12 मधील अ मध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान प्रकिया पार पडेल. 3 लाख 29 हजार 569 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये पुरुष मतदार 1 लाख 74 हजार 696 तर महिला मतदार 1 लाख 54 हजार 807 असतील तर (तृतीयपंथी) इतर मतदार 13 आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 6 कर्मचारी असतील. तर 450 ईव्हीएम मशीनवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. 10 टक्के ईव्हीएम मशीन एखाद्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास राखीव असतील. गत महापालिका निवडणुकीत 62 टक्के मतदान झाले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More