धुळे तालुक्यात गाईला घातला दुग्धाभिषेक – eNavakal
News आंदोलन महाराष्ट्र

धुळे तालुक्यात गाईला घातला दुग्धाभिषेक

धुळे – दुधाला थेट पाच रुपयांचे अनुदान देण्यात यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचे पडसाद गाव, खेड्यातदेखील उमटू लागले आहेत. धुळे तालुक्यातील तिसगाव येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून शेतकर्‍यांनी आंदोलन करीत लक्ष वेधले. तर धनुर गावात शेतकर्‍यांनी दूध संकलन बंद पाडले.

तिसगाव येथे गायीला दुग्धाभिषेक करून दूध उत्पादक शेतकर्‍यांनी अनोखे आंदोलन करीत शासनाचा निषेध नोंदविला. दुधाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून काही शेतकर्‍यांनी गाई आणि म्हशीचे दूध गावाबाहेर जाऊ दिले नाही. दोन दिवसांपासून स्वाभिमानी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी सरकारकडे केलेली दरवाढीची मागणी अगदी रास्त आहे, अशा घोषणा यावेळी शेतकर्‍यांनी दिल्या. तिसगाव येथील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी गोरगरीब जनतेस, लहान बालके व वृध्दांना दुधाचे मोफत वाटप करुन सरकारचा जाहीररीत्या निषेध केला. रोज हजारो लीटर दूध येथून बाहेर जाते. परंतु, आज एकही लीटर दूध शेतकर्‍यांनी संकलन केंद्रावर दिले नाही. हजारो रुपयांचा आर्थिक फटका सर्व दूध उत्पादक शेतकर्‍यांनी सहन करून हे आंदोलन केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More