धीर सोडू नका, सरकार तुमचचं आहे : उद्धव ठाकरे – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

धीर सोडू नका, सरकार तुमचचं आहे : उद्धव ठाकरे

उस्मानाबाद – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वीच ते काटगावमध्ये दाखल झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर एका शेतकरी महिलेने हंबरडा फोडला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर देताना म्हटले, ‘तुम्ही मोठ्या आशेने भेटीला आला आहात, जे मी बोलतो ते करतो. जे बोलत नाही ते करतही नाही. मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो. आकडे सांगायला आलो नाही. त्यामुळे धीर सोडू नका, खचून जाऊ नका, हे सरकार तुमचंच आहे, मी फक्त तुम्हाला दिलासा द्यायला आणि आशीर्वाद घ्यायला आलो आहे.’ त्याचबरोबर ‘नुकसानग्रस्तांनी स्वत:ला एकटे समजू नये, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे’, असे आश्वासनही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले.

असा आहे उद्धव ठाकरेंचा उस्मानाबाद दौरा

सकाळी ९.३० वा : सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावला (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) जातील. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची, शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणी करून तुळजापूरमार्गे अपसिंगा-कात्री येथे जातील.

दुपारी १२ वा : अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाला जातील.

दुपारी १ वा : पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा व अभ्यागतांना भेटून पत्रकारांशी संवाद साधतील.

दुपारी दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूरला येऊन तेथून विमानाने मुंबईला परत येतील.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

धीर सोडू नका, सरकार तुमचचं आहे : उद्धव ठाकरे

उस्मानाबाद – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वीच ते काटगावमध्ये दाखल झाले. त्यावेळी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 54,044 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 76,51,108 वर

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 54 हजार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई वाहतूक

अकराची वेळ काय कामाची? महिलावर्गात नाराजी

मुंबई – सर्वसामान्य महिलांना लोकल प्रवास करू देण्याच्या मागणीला अखेर काल यश आलं. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या लोकलमधून आजपासून सरसकट सर्व महिलांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन! मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमाला राज्यपाल गैरहजर

मुंबई – आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस ‘पोलीस स्मृती दिन’ म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी शहीद पोलीस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

IPL 2020 : शिखरची शतकी खेळी व्यर्थ; पंजाबचा दिल्लीवर दणदणीत विजय

दुबई – काल रंगलेल्या आयपीएल सामन्यात निकोलस पुरनच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा जोरदार पराभव केला. दिल्लीने पंजाबला विजयासाठी 165 धावांचे...
Read More