धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात शिवसेना न्यायालयात जाणार – eNavakal
महाराष्ट्र

धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात शिवसेना न्यायालयात जाणार

नाशिक – महानगरपालिकेकडून हातोडा पडणाऱ्या सुमारे साडे पाचशे धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी शिवसेना आता पुढे सरसावली आहे. धार्मिक स्थळांविषयी महानगरपालिकेने चुकीचे सर्वेक्षण केले. न्यायालयात मनपाला भक्कमपणे बाजू मांडता न आल्यानेच न्यायालयाने मोकळ्या जागेतील धार्मिक स्थळे हटविण्याचा निर्णय दिल्याचे स्पष्ट करत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी धार्मिक स्थळे हटविण्याच्या निर्णयाच्या विरोधात सर्वाच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती दिली.

मनपा हद्दीतील आरक्षित मोकळ्या जागेत सुमारे सहाशे धार्मिक स्थळे आहेत. हे स्थळे लोकवर्गणीतील बांधण्यात आलेले आहेत. धार्मिक स्थळांच्या आवारात विविध लोकप्रतिनिधीनी आपल्या निधीतून सभागृहे तसेच शेड बांधून दिलेले आहे. या धार्मिक स्थळांचे चुकीचे सर्वेक्षण केल्याने न्यायालयाने सदर स्थळे हटविण्याचा निर्णय दिला. यामुळे शहरवासियांमध्ये खळबळ उडाली असून मनपाच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे. याची गंभीर दखल शिवसेनेने घेतली आहे. लोकभावना लक्षात घेवून धार्मिक स्थळे हटविण्याच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. आपल्या परिसरातील धार्मिक स्थळांची कागदपत्रे तातडीने सेना कार्यालयात आणून द्यावेत असे आवाहन अजय बोरस्ते यांनी केले आहे. रामाचे नाव घेत सत्ता मिळवणाऱ्या भाजपाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असतांना मंदिरांवर अशी वेळ येतेच कशी असा सवाल करत बोरस्ते यांनी भाजपावर निशाणा साधला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहीहंडी निमित्त आज शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई- दहीहंडी उत्सव असल्याने उद्या शनिवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उद्या...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More