धार्मिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी आज केदारनाथमध्ये – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

धार्मिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी आज केदारनाथमध्ये

डेहराडून – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. उद्या रविवारी या टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या धार्मिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथमध्ये असून उद्या बद्रीनाथला जाणार आहेत. हा दौरा म्हणजे मोदींचा गुप्त प्रचार असेल, असे दिसत आहे. आज सकाळी ९ वाजता ते केदारनाथला पोहोचले असून त्यानंतर तेथील गुहेत ते ध्यानसाधनेस बसले आहेत.

नियोजित वेळापत्रकानुसार, मोदी सर्वप्रथम केदारनाथ मंदिरात विशेष पूजा आणि रुद्राभिषेक करतील. त्यांच्या या दौऱ्यासाठी तेथील प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या आगमनाने तेथील धार्मिक जनतेत उत्साहाचे वातावरण आहे.

अकरावे जोतिर्लिंग असलेल्या केदारनाथधामची उंची समुद्र सपाटीपासून ११,७०० फूट उंच आहे. तर मंदिर परिसरापासून दीड किलोमीटर दूर ध्यान धारणेसाठी असलेली गुहा १२,२५० फूट आहे. दरम्यान, आज केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परंतु पंतप्रधानांच्या वेळापत्रकात यामुळे कोणताही बदल होणार नसल्याचे समजते आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More