धारावी-घाटकोपरमध्ये शस्त्रांच्या विक्रीप्रकरणी चौघांना अटक – eNavakal
News मुंबई

धारावी-घाटकोपरमध्ये शस्त्रांच्या विक्रीप्रकरणी चौघांना अटक

मुंबई- शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत घातक शस्त्रांची विक्रीप्रकरणी चार आरोपींना गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या चारही आरोपींकडून पोलिसांनी दोन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत केले आहे. चौघांपैकी दोघांना पोलीस तर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. धारावी येथे काही जण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी धारावी रेस्ट्रॉरंटजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या मोहम्मद रिझवान रज्जबअली शेख आणि मोहम्मद मारुफ मोहम्मद हमीद इद्रीसी या दोघांनाही पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे सापडले. चौकशीत त्यांनी ते तिथे गावठी कट्ट्याच्या विक्रीसाठी आले होते. अटकेनंतर या दोघांनाही येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही घटना ताजी असतानाच याच पथकाला घाटकोपर परिसरात अन्य काही तरुण शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घाटकोपरच्या नारायणनगर, नागरी सेवा सदर रोडवरील होमगार्ड मुख्यालयजवळ साध्या वेशात पाळत इेवून साजिद अली आसिफअली सय्यद आणि अमजद नवाज खान या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसे जप्त केले आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) एका छोट्या मुलीने जगभरात वादळ निर्माण केलंय आपण कधी जागृत होणारच नाही का?

मुंबईत बसणार्‍याला खूप उकडतंय, पुण्यात तर चटके असह्य होतायत, विदर्भ मराठवाड्यात सतत दुष्काळ पडतोय, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात चैत्रात पाऊस पडतोय, गारांचा मारा होतोय,...
Read More