धर्मा पाटलांचा बळी गेल्यानंतर 4 लाखांचा मोबदला 54 लाखांवर गेला – eNavakal
मुंबई राजकीय शेती

धर्मा पाटलांचा बळी गेल्यानंतर 4 लाखांचा मोबदला 54 लाखांवर गेला

इतर 12 प्रकल्पबाधितांनाही वाढीव मोबदला मिळणार। अधिकारयांवर कारवाई व्हावी                                                                                                                              मुंबई – धुळयाचे शेतकरी धर्मा पाटील यांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांच्या जमिनीच्या फेरमुल्यांकनाची प्रक्रिया पार पडली. पाटील कुटुंबियांना 4 लाख रुपये दिलेल्या सरकारने आता नउ पट जास्त म्हणजे 54 लाख रुपयांचा मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणामुळे इतर 12 प्रकल्पबाधित शेतकाऱ्यांना  नाही सरकारकडून वाढीव मोबदला मिळणार आहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीची फेरतपासणी करणारया सरकारी अधिकारयांना याआधी योग्य मोबदला का नाही देता आला? त्या संबंधीत अधिकारयांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.                                                                                                                                                                                      धुळे जिल्हयातील दोंडाई येथे उभारण्यात येणार्‍या वीज प्रकल्पासाठी विखरण शिवारात गट क्रमांक 291/2 अ मधील शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर शेतजमिन सरकारने संपादित केली होती. परंतु, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाटील कुटुंबीयांना अवघे 4 लाख 3 हजार रुपयांचा मोबदला मिळाला होता. तर त्यांच्या शेजारी असलेल्या शेतमालकाला गुंठाभर जमिनीसाठी एक कोटी 89 लाखांचा मोबदला मिळाला होता. धर्मा पाटील यांना हा मोबदला मान्य नव्हता. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडे होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती होती. इतर शेतकर्‍यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू ठेवला. मात्र, सरकारकडून न्याय न मिळाल्याने अखेर, 22 जानेवारी रोजी मंत्रालयात विष पिउन आत्महत्येचा प्रयत्न केला. जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारी कामकाजाची चक्र वेगाने फिरू लागली. पाटील यांच्या जमिनीच्या फेरमुल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आणि त्यांच्या कुटुंबियांना संपादित केलेल्या जमिनीसाठी 54 लाखांचा मोबदला जाहीर झाला. या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी ऊर्जा विभागाला सादर केला. सरकारकडून नव्याने देण्यात येणार्‍या मोबदल्यात मनरेगा कायद्यातील तरतुदीनुसार सानुग्रह अनुदानाचा समावेश आहे. तसेच संपादनावेळी या जमिनीवर असलेल्या आंब्याच्या झाडांचे मूल्यही विचारात घेण्यात आले आहे. त्यानुसार शासनाकडून धर्मा पाटील यांच्या नावे 28 लाख 5 हजार 984 रुपये तर त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना 26 लाख 42 हजार 148 रुपयांचा मोबदला मान्य करण्यात आला आहे. इतर 12 प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनाही वाढीव मोबदला मिळणार आहे.
शेतजमिनीच्या फेरतपासणीसाठी 84 वर्षीय धर्मा पाटील यांनी अगदी तलाठी, जिल्हाधिकारी कार्यालयापासून थेट मंत्रालयापर्यंत जोडे झिजवले. शेवटी व्यथित होवून त्यांनी मंत्रालयातच आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूपूर्वीच हा मोबदला दिला असता तर धर्मा पाटील यांना जीव गमवावा लागला नसता. या प्रक्रियेतील अधिकारयांना यापूर्वीच्या तपासणीत जमिनीला योग्य भाव दिसला नाही का? त्या प्रशासकीय अधिकारयांच्या हलगर्जीपणामुळे धर्मा पाटील यांना नाहक मनःस्ताप झाला. त्या संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करावी. जेणेकरून दुसरा धर्मा पाटील राज्यात होणार नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

बिग बींच्या नातीचं न्यूयॉर्कच्या रस्त्यावर वर्कआऊट

नवी दिल्ली – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही तिच्या फिटनेसमुळे बरीच चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार असा प्रश्न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वाहन परवान्यासाठी आता शैक्षणिक अट नाही

नवी दिल्ली – वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट काढून टाकण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे वयाची...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

मुंबई – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. बायफोकल वगळता इतर शाखांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ जूनपर्यंत सुरू राहणार असून पहिली गुणवत्ता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More