धबधब्यातील पाण्याचा प्रवाहात अडकलेल्या 13 पर्यटकांची सुटका – eNavakal
News महाराष्ट्र

धबधब्यातील पाण्याचा प्रवाहात अडकलेल्या 13 पर्यटकांची सुटका

रत्नागिरी-धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने 13 पर्यटकांवर आज रत्नागिरी मध्ये बाका प्रसंग ओढवला, मात्र सुदैवाने याच धबधब्यावर रॅपलिंगसाठी आलेल्या रत्नदुर्ग माउंटनियरिंगच्या पथकाने या 13 लोकांना प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले आहे. रत्नागिरी राजापूर मार्गावरील चुनाकोळवन एथिओ सवतकडा इथे हा सगळा प्रकार घडला आहे.

कोल्हापूरवरून आलेले हे 13 पर्यटक धबधब्याचे पाण्याचे पात्र उलटून पलीकडे गेले होते. ज्या बाजूला उंच कडा आहे. याच दरम्यान धबधब्याच्या वरील पट्या मध्ये जोरदार पाऊस झाला आणि धबधब्याचे पाणी वाढले. पाण्याचा प्रवाह इतका वाढला, की या 13 जणांना पलीकडे येणे शक्यच नव्हते.

सुदैवाने या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढल्याने रॅपलिंग बंद करून निघत असलेल्या रत्नदुर्गच्या मंडळींना ही गोष्ट लक्षात आली.
मग रत्नदुर्गच्या मंडळीनी दोर्‍या फेकत या 13 लोकांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने ही टीम याच धबधब्यावर असल्याने या 13 लोकांची तत्काळ सुटका झाली. अन्यथा रत्नागिरीतून मदत गेल्या शिवाय त्या 13 पर्यटकांची सुटका झाली नसती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More