धनराज महालेंची घरवापसी! शिवसेनेत परतले – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

धनराज महालेंची घरवापसी! शिवसेनेत परतले

मुंबई – लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले दिंडोरीचे माजी आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे. आज मातोश्रीवर जाऊन धनराज महाले यांनी घरवापसी केली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधले आहे.

राष्ट्रवादीने त्यांना दिंडोरी मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. मात्र भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी त्यांचा पराभव केला. धनराज महाले हे माजी खासदार हरीभाऊ महाले यांचे पुत्र आहेत. 2009 साली ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते.  मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यंदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार यांना तिकीट दिल्याने, धनराज महाले यांनी शिवसेना सोडली होती.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई – मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी आज रविवार, 18 ऑगस्ट 2019 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) भारताच्या मुत्सद्देगिरीचे अपूर्व यश

जम्मू काश्मिरमधील 370कलम हटवण्याच्या विरोधात पाकिस्तानकडून जे जे प्रयत्न होत आहेत त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More