धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे शिष्यवृत्ती – मुख्यमंत्री – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे शिष्यवृत्ती – मुख्यमंत्री

मुंबई- धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांना आदिवासींप्रमाणे योजना लागू होणार असल्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मंत्रिमंडळ उपसमितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपसमितीच्या या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, राम शिंदे, महादेव जानकर, एकनाथ शिंदे, विष्णू सावरा, संभाजी पाटील-निलंगेकर आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, टीआयएसएसच्या अहवालावर पुढची कारवाई करण्यासाठी तो आम्ही अ‍ॅडव्होकेट जनरलकडे पाठवत आहोत. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात अ‍ॅफिडेव्हीट दाखल करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी समाजाला ज्या योजना लागू आहेत त्या धनगर समाजाला आता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गरीब धनगरांसाठी आदिवासींप्रमाणे आश्रमशाळा, तसेच हॉस्टेल तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला. धनगर समाजाच्या मुलांना आदिवासींप्रमाणे प्री मॅट्रीक आणि पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय, ज्या दुर्गम भागातील मुलांना हॉस्टेलला प्रवेश मिळत नाही त्यांच्यासाठी आदिवासींप्रमाणे ‘स्वयंम’ योजना, नामांकित शाळांमध्ये गरीब आणि दुर्गम भागातील धनगर मुलांना प्रवेश देण्याचा निर्णयही घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आदिवासींप्रमाणे भूमिहीन धनगरांसाठी शेतजमिनी खरेदीची योजना सुरू करण्यात येईल. तसेच शेळी-मेंढी महामंडळाचा स्कोप वाढवत आहोत. त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी महामंडळाऐवजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी उद्योजकता विकास आणि शेळी-मेंढी महामंडळ असे म्हटले जाईल. यामध्ये बिनव्याजी कर्जाच्या योजना सुरू करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लागल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असून 5 मार्चला होणार्‍या बैठकीत त्याबाबत घोषणा करणार असल्याचे ते म्हणाले. आदिवासी आणि शेड्यूल कास्टसाठी घरकूलची योजना चालवतो तशी योजना धनगर समासाठी चालवण्यात येईल. पहिल्या टप्प्यात 10 हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबत अर्थसंकल्पामध्ये तरतूदही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येतील त्याचबरोबर न्यायालयामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More