धनंजय मुंडेंची सर्वोच्च न्यायालयात धाव – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

धनंजय मुंडेंची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारी जमीन गैरव्यवहार केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजाभाऊ फड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी यावेळी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी देत असताना औरंगाबाद धनंजय मुंडे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

बेलखंडी मठाला इनाम म्हणून दिलेली सरकारी जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करत जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. नियमानुसार इनाम दिलेल्या जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही पण दबाव आणून या जमिनीची खरेदी केल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. शिवाय जमीन कृषक असताना ती अकृषक करून घेतल्याचेही याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. दरम्यान, सदर जमिनीच्या 7/12 वर जमीन इनाम असल्याचा कुठलाही उल्लेख नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी सांगितले होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More