धनंजय मुंडेंची शिवसेनेवर टीका – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

धनंजय मुंडेंची शिवसेनेवर टीका

जालना – आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर आसूड घेऊन फिरत होते. कर्जमाफी देता की जाता असे म्हणत होते. आता लाचारी पत्करून सरकारमध्ये असल्याने त्यांना काही देता पण येत नाही आणि जाता पण येत नाही अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या सभा आज जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र दुष्काळात होरपळू लागला आहे.

गावागावात टँकरची सोय केलेली नाही आणि जलयुक्त शिवार योजनेची जाहिरातबाजी तर अशी केली आहे की राज्याबाहेरील लोकांना वाटतंय महाराष्ट्र जलमय आहे. यांच्या राज्यात महाराष्ट्राची प्रगती पाण्याखालीच गेली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतकर्‍यांना साले म्हणतात. आंदोलनं चिरडण्यासाठी शेतकर्‍यांना पायाखाली गोळी मारायला हवी होती अशी वाच्यता करतात. आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरून दाखवाच, नाही लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली तर सांगा, असा इशारा मुंडे यांनी दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके यांच्या 13 महागड्या गाड्या लिलावात...
Read More