धक्कादायक! प्रसूतीच्या शस्त्रक्रियेनंतर कापूस, बँडेज-पट्टी राहिली पोटातच! – eNavakal
आरोग्य गुन्हे

धक्कादायक! प्रसूतीच्या शस्त्रक्रियेनंतर कापूस, बँडेज-पट्टी राहिली पोटातच!

गडचिरोली – गडचिरोली तालुक्यातील कनेरी येथील जिल्हा व बाल रुग्णालयात एक अजब प्रकार घडला आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला आणि तिच्या घरच्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. कांता शर्मा असे पिडीत महिलेचे नाव आहे. पिडीत महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेऊन रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर मांडला आहे.

१० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कांता शर्मा प्रसूतीसाठी महिला व बाल कल्याण रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. उपस्थित परीचारीकाने प्रसूतीसाठी वेळ असल्याचे सांगून तब्बल १० तास लक्ष दिले नाही. कुटुंबियांच्या दक्षतेनंतर सायंकाळी ६ च्या सुमारास कांता यांना प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया गृहात नेण्यात आले. ७ वाजून ५० मिनिटांनी नैसर्गिक प्रसूती झाली; पण तब्बल दोन तासानंतर पुन्हा कांता यांना शास्त्रक्रियेसाठी नेण्यात आले, त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने विचारपूस केल्यावर, ‘तुम्हाला जमते तर तुम्हीच शस्त्रक्रिया करा, इतके माहित आहे तर घरीच का प्रसूती केली नाही’ अशा शब्दांत घरच्यांचा अपमान केला. हा सर्व प्रकार पिडीत महिलेने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितल्याने जिल्हा व बाल रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे, त्यामुळे संबधित परिचारिकेवर आणि रुग्णालयाच्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More
post-image
News मुंबई

मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरची जागा का नको-हायकोर्ट

मुंबई – मुंबईतील संवेदनशील आरे कॉलोनीतील हजारो झाडांचा बळी घेऊन आणि पर्यावरणाचा र्‍हास करून मेट्रो कारशेड उभारण्या ऐवजी कांजूरमार्ग येथे मोकळ्या जागेचा पर्याय म्हणून...
Read More