धक्कादायक प्रकार, पहिली ते 5 वीच्या मुलांसाठी लैंगिक गोष्टी असलेली पुस्तके! – eNavakal
मुंबई शिक्षण

धक्कादायक प्रकार, पहिली ते 5 वीच्या मुलांसाठी लैंगिक गोष्टी असलेली पुस्तके!

मुंबई – पहिली ते 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने लैंगिक गोष्टी असलेली पुस्तके खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मत्स्यगंधेच्या कौमार्याची कहाणी विद्यार्थ्यांना या पुस्तकातून वाचायला मिळणार आहे. ही सर्व पुस्तके पहिली ते 5 वीच्या विद्यार्थ्यांच्या पुरक वाचनासाठी असल्याचा हास्यास्पद दावा शिक्षण विभागाने केला आहे. शिक्षण विभागाच्या या दाव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकातील कथा आणि मजकूर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम करणारे असून शिक्षणमंत्र्यांमध्येच आकलनाचा दोष असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

शालेय शिक्षण विभागाने पहिली ते 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी लैंगिक गोष्टी असलेल्या पुस्तकांची खरेदी केली आहे. शिक्षण विभागाकडून ‘बाल नचिकेता’ हे पुस्तक खरेदी करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये पुराणातल्या अनेक लैंगिक गोष्टींवर भर देण्यात आला आहे. यासोबतच अनेक अश्लील घटनांचे संदर्भही या पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकातील मजकुरात म्हटले आहे की, ‘देवाची काय इच्छा आहे?’ तिने असे विचारताच ते तिघेही अतिथी एकदम म्हणाले, ‘देवी! नग्न होऊन तु आम्हास भोजन द्यावे.’ त्यांच्या त्या विचित्र मागणीने तिला आश्चर्याचा धक्काच बसला. पण तिने
स्वतःला सावरले. स्वयंपाकघरात गेली. पतीचे स्मरण केले. त्यांनी देवासमोर ठेवलेले तीर्थ घेऊन बाहेर गेली. मनात संकल्प केला, ‘ हे अतिथी माझी बाळेच आहेत.’ यांच्यापुढे मला संकोचायचे काय कारण? असे म्हणून मातृत्वाच्या वात्सल्याने तिने ते तीर्थ त्या तिघांच्या अंगावर प्रोक्षण केले. त्याबरोबर ते तिघेही लहान अर्भके होऊन खेळू लागली. या पुस्तकांमधला हा मजकूर पाहून ही पुस्तके प्राथमिक शिक्षण घेणार्‍या मुलांसाठी आहेत का? पहिली ते पाचवीच्या मुलांना या संदर्भांची गरज काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
विरोधकांनीही या पुस्तकातील मजकूर आणि खरेदीवर तोफ डागली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाने मुलांच्या अवांतर वाचनासाठी निश्चित केलेल्या पुस्तक खरेदीत मोठा घोळ झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत प्रकाशन ‘भारतीय विचार साधना’ यांचे जे पुस्तक 20 रूपयाला उपलब्ध आहे, तेच पुस्तक सरकारने चक्क 50 रूपयांत खरेदी केले असून या प्रकाशनाकडून तब्बल 8 कोटी 17 लाख रुपयांची खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुणे येथील ‘भारतीय विचार साधने’च्या कार्यालयात ‘बाल नचिकेता’, ‘महर्षी अत्रे’ ही पुस्तके प्रत्येकी 20 रुपयाला मिळतात. सरकारने हीच पुस्तके 50 रूपयाला एक प्रत या दराने विकत घेतल्याचे सांगताना विखे पाटील यांनी या पुस्तकांच्या खरेदीची पावतीच पत्रकारांसमोर सादर केली. ‘भारतीय विचार साधने’वर ही सरकारी मेहरबानी का? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या पुस्तकांमधील मजकुराच्या दर्जावर विखे पाटील यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यातील भाषा प्राथमिक शाळेतील मुलांच्या डोक्यावरून जाणारी आहे. या वयोगटातील मुलांना कथा समजावी यासाठी चित्रांचा वापर अधिक केला जातो. पण या पुस्तकांमध्ये ‘कथा गणपती’सारखी एक-दोन पुस्तके सोडली तर उर्वरीत सार्‍या कथा चित्राविना आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बोजड भाषेत लिहिलेल्या आहेत. अत्यंत कठीण व लहान मुलांसाठी अनावश्यक अशा शब्दांचा वापर केलेल्या कथांचा मजकूरच विखे-पाटील यांनी यावेळी वाचून दाखवला. या पुस्तकांच्या खरेदीत विशिष्ट पौराणिक व धार्मिक कथांचा भर आहे. यातून मुलांवर विशिष्ट विचारधारेचा संस्कार लादण्याचा सरकारचा घाट असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शिक्षण खात्याच्या या कारभारावर टीका केली. लैंगिक प्रस्तावाला विरोधात असताना भाजपाने विरोध केला होता. मात्र आता शालेय विद्यार्थ्यांना लैंगिकतेचे शिक्षण देण्याचा या सरकारने घाट घातला आहे. लैंगिकतेच्या गोष्टी असलेली ही पुस्तके वाचली कोणी, तपासली कोणी? हे सरकार कुठलीच जबाबदारी घेणार नसेल तर सरकार चालवतेय कोण? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More