द्वारकामाईत ‘साईबाबा’ प्रकटले – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

द्वारकामाईत ‘साईबाबा’ प्रकटले

नाशिक – साईबाबांच्या आगमनापासून निर्वाणापर्यंतचे वास्तव्य द्वारकामाई मशिदीत होते. त्यांनी अखेरचा श्वासही येथेच घेतला. त्यामुळे भक्तांच्या दृष्टीने द्वारकामाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बुधवारी रात्री त्याच द्वारकामाईत भिंतीवर साईबाबांच्या चेहऱ्याची प्रतिमा दिसली आणि चर्चेला उधाण आले. त्यामुळे साईभक्तांसह अवघ्या शिर्डीकरांची द्वारकामाईत दर्शनासाठी गर्दी लोटली होती.

बुधवारी रात्री 12 ते 3 च्या दरम्यान साईबाबा दीर्घकाळ जिथे राहिले त्या शिर्डीच्या द्वारकामाईत भिंतीवर साईंची प्रतिमा उमटली. जिथे साईबाबा कायम बसायचे त्या भिंतीवर साईबाबांचा चेहरा असलेली प्रतिमा दिसत असल्याची वार्ता पसरताच मध्यरात्रीनंतर भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. साईंचा चेहरा दिसला, साईबाबा अवतरले असा दावा दिल्लीहून आलेल्या एका साईभक्ताने केला. साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याचे समजताच मध्यरात्री भक्तांची मोबाईलमध्ये साईंचा फोटो काढण्यासाठी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. याआधीही ६ जानेवारी २०१२ रोजी अशीच घटना घडली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई –  ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत मुंबईसह राज्यभरातील गणपती बाप्पाला निरोप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उत्तर भारतात पावसाचे थैमान, ८ जणांचा मृत्यू

चंडीगड – केरळमध्ये पावसाने हैदोस घातल्यानंतर आता उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे ८ जणांना जीवाला मुकावे लागले आहेत. तर, पंजाब, हरयाणा...
Read More