दोन महत्त्वाच्या मेट्रो मार्गांच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मान्यता – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

दोन महत्त्वाच्या मेट्रो मार्गांच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई – मुंबईतील वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मेट्रो मार्ग 9- दहिसर ते मिरा-भाईंदर व मेट्रो मार्ग 7 अ-अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांच्या अंमलबजावणीस आज राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली. या दोन्ही मेट्रो मार्गांच्या उभारणीसाठी 6,607 कोटी रुपये एवढा निधी खर्च होणार असून त्याला आज राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
यवतमाळ आणि सांगली जिल्ह्यातील मौजे पेठ येथे अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यासही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या महाविद्यालयांमध्ये अन्नतंत्रज्ञानाचे अत्याधुनिक शिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी 104 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे मौजे पेठ हे गाव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांच्या वाळवा मतदारसंघात आहे. यवतमाळ हा अन्न व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांचा मतदारसंघ आहे. आधीच भाजपा व शिवसेनेच्या मंत्री, आमदार व नेत्यांमध्ये एखादा निर्णय किंवा योजना आपल्या मतदारसंघात नेण्यात मोठी स्पर्धा असताना विरोधी पक्षाच्या मतदारसंघात हे अत्याधुनिक महाविद्यालय स्थपण्याचा निर्णय कसा घेतला गेला, याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. विविध शस्त्रक्रिया व उपचारांसाठी मिळणाऱ्या विमा निधीपैकी 20 टक्के रक्कम संबंधित डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर राज्यात जागतिक दर्जाचे इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी विविध सोयी, सुविधा देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

केंद्रीयमंत्री अनुप्रिया पटेलने भाजपाची साथ सोडली

लखनऊ – केंद्रीय मंत्री व अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी भाजपाची साथ सोडली आहे. भाजपाने आमच्या सहकार्‍यांना सांभाळून घेतले नाही. आमच्या तक्रारीचे निरसन...
Read More
post-image
News देश

सराफांच्या भिशीवर बंदी सरकारने अध्यादेश काढला

नवी दिल्ली- दाग-दागिने विकणार्‍या सराफांच्या भिशीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसा अध्यादेशच आज सरकारने काढला. या अध्यादेशान्वये सराफ चालवत असलेल्या अल्पबचत योजनेवर बंदी...
Read More
post-image
News मुंबई

शक्ती मिल बलात्कार प्रकरण! हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यात फाशी नाही, तर बलात्कारात का?

मुंबई- एखाद्याची हत्या करणे अथवा शरीराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही . त्या मुळे हत्ये पेक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More