दोन अपघातात महिलेसह तिघांचा मृत्यू – eNavakal
अपघात मुंबई

दोन अपघातात महिलेसह तिघांचा मृत्यू

मुंबई – चेंबूर आणि मालाड येथील दोन अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालवणी आणि चेंबूर पोलिसांनी दोन अपघाताची नोंद केली असून एका चालकास अटक केली तर दुसर्‍याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरज चरणजीत सिंग हा कांदिवलीतील चारकोप गावात राहतो. त्याचा लहान भाऊ रोशन चरणजीत सिंग हा बाईकवरुन त्याचा मित्र किरण खरात याच्यासोबत शनिवारी रात्री साडेअकरा वाजता मालाड येथून जात होता. आयएनएस हमलाजवळील मढ मार्वे रोडवर एका मिक्सर डंपरने समोरुन त्यांच्या बाईकला धडक दिली होती. त्यात रोशन आणि किरण हे दोघेही जखमी झाले होते. या दोघांनाही जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, यावेळी दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर घटनास्थळी गेलेल्या मालवणी पोलिसांनी डंपरचालकास अटक केली आहे. दुसरा अपघात चेंबूर येथे झाला. एका कारच्या धडकेने रिना सतीश सावी या महिलेचा मृत्यू झाला. सचिन भीमराव सूर्यवंशी हे चेंबूर येथे राहत असून रिना सावी या त्यांची बहिण आहे. शनिवारी सकाळी त्या त्यांच्या अ‍ॅक्टिव्हा बाईकवरुन जात होते. कमलेश ज्वेलर्ससमोरुन जात असताना त्यांना एका टाटा आयशर कारने धडक दिली होती. त्यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रिना यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अपघातानंतर कारचालक रिना यांना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना माहिती न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी कारचालकाचा शोध सुरु केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबई – राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे....
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

मालेगावातील पावरलूम मालकांवर गुन्हे दाखल

नाशिक – राज्यातच नाही तर नाशिक जिल्ह्यातही सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना मालेगावात अनेक पावरलूम सुरूच होते. मात्र अखेर पाच पॉवरलूम मालकांवर गुन्हे दाखल...
Read More
post-image
महाराष्ट्र

घाटी रुग्णालयात डॉक्टर परिचारिकांचे स्क्रीनिंग सुरू

औरंगाबाद – औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या निवासी डॉक्टर आणि परिचारिकांची स्क्रिनिंग घाटी रुग्णालयात करण्यात येत आहे. कोरोनाच्या 3...
Read More
post-image
देश विदेश

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस यांची प्रकृती खालावली, पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस

लंडन – १० दिवसांपूर्वी बोरिस यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर नियमित चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात नेले असता प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात हलवण्यात...
Read More