दैनंदिन रुग्णवाढीचा नवा उच्चांक; 24 तासांत तब्बल 1,26,789 नवे कोरोना रुग्ण – eNavakal
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

दैनंदिन रुग्णवाढीचा नवा उच्चांक; 24 तासांत तब्बल 1,26,789 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असतानाच देशभरातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. आता तर देशात दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. देशात मागील 24 तासांत तब्बल 1,26,789 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 685 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,29,28,574 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,66,862 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 59,258 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,18,51,393 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 9,10,319 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. त्यानंतर यावर्षी ५ एप्रिलला पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखांचा टप्पा पार केला होता. तर देशात काल तब्बल 1,15,736 आणि आज 1,26,789 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, २०२० साली भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉक काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

दैनंदिन रुग्णवाढीचा नवा उच्चांक; 24 तासांत तब्बल 1,26,789 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असतानाच देशभरातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. आता तर देशात दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे मुंबईत निधन

मुंबई – गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे गिरणी कामगार संघर्ष समितीचे दत्ता इस्वलकर यांचे बुधवारी (7 एप्रिल) निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. तब्येत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

कोरोनाचा उद्रेक! आता ‘या’ शहरातही नाईट कर्फ्यू

मुंबई – देशात कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय झपाट्याने होत आहे. त्यामुळे सर्व राज्यांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र, दिल्ली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

पंतप्रधान मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आज सकाळी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांनी लसीचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 10,428, पुण्यात 10,907 नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 31,73,261 वर

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे अशी काळजी घेणे...
Read More