जोधपुर – बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास आज हिंदू पद्धतीने लग्न बंधनात अडकणार आहेत. काल ख्रिश्चन पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये त्यांचा शानदार विवाह सोहळ्याचे कार्यक्रम सुरू आहेत. बॉलीवूड, हॉलीवूडचे प्रसिद्ध सितारे देखील या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्यांच्या साक्षीने देसी गर्ल आज हिंदू पद्धतीने विदेशी होणार आहे. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईत प्रिक्सच्या लग्नाचे शानदार रिसेप्शन सोहळे पार पडणार आहेत.
