देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी – eNavakal
महाराष्ट्र

देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी

Hasan-Mushrif

मुंबई – राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत काल निर्गमित करण्यात आला असून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचे कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी या मागणीसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीस अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला. मुश्रीफ म्हणाले, संरक्षण दलातील शौर्य पदकधारक, सेवा पदकधारक यांना तसेच अशा पदकधारकांच्या विधवा किंवा त्यांच्या अवलंबितांना त्यांच्या वापरात असणाऱ्या एका निवासी इमारतीस ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी देण्याची तरतूद सध्या आहे. आता ही तरतूद व्यापक करुन राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आजी, माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निःस्वार्थपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता सर्व आजी, माजी सैनिकांना भावनिक दिलासा देणे व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला, असे मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले. अशा करमाफीस पात्र ठरणाच्या व्यक्तींनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी

मुंबई – राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार पार

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ४२७ जणांना गेल्या २४...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जम्मू-काश्मीरमधील १० हजार जवानांना माघारी बोलावले, केंद्र सरकारचा आदेश

श्रीनगर – निमलष्करी दलाबाबत केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेल्या १० हजार जवानांना माघारी बोल‌वण्याचा निर्णय घेण्यात आला...
Read More
post-image
मनोरंजन

विराट कोहलीचा ‘मोस्ट ऍडमायरेबल पर्सन’ माहितेय कोण?

मुंबई – क्रिकेटप विराट कोहलीच्या स्क्रॅपबुकमधून एक सिक्रेट गोष्ट बाहेर आली आहे. विराटचा मोस्ट अॅडमायरेबल पर्सन अभिनेता ऋतिक रोशन आहे. विराटच्या एका बालमित्राने सोशळ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज १३ हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद तर, ३४६ रुग्णांचा मृत्यू

मुंबई – राज्यात आज ९०११ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण...
Read More