देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गरिबी, उपासमार आणि असमानता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा अहवाल जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक(एमपीआय)ने दिला आहे. तसेच, निती आयोगाच्या 2019 च्या शाश्वत विकास ध्येय अहवालानुसार गरिबी, उपासमार आणि आर्थिक असमानता अधिक व्यापक असून यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असं म्हटलं आहे.
भारतात ३६.४ कोटी एमपीआय गरीब आहेत, ज्यात १५.६ कोटी (३४.६ टक्के) मुलं आहेत. भारतातील जवळपास २७.१ टक्के गरिबांना आपला दहावा जन्मदिवसही पाहायला मिळत नाही. यापूर्वीच या मुलांचा मृत्यू होतो. 2019-20 आणि 2015-16 या दोन्हीं वर्षांतील आकडेवारीत काहीच तफावत नसल्याचे समोर आले आहे.
निती आयोगाने जाहीर केलेल्या आधार रेषा अहवालानुसार २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गरिबी वाढली आहे. गरिबी वाढलेल्या राज्यांमध्ये बिहार, ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, पंजाब आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांमध्येच फक्त गरिबी कमी झाली आहे. मेघालय, हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रातील परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दिल्ली, जम्मूनंतर आता महाराष्ट्रातही भूकंपाचे धक्के, ‘या’ जिल्ह्यात जाणवले हादरे

सातारा – देशभर विविध राज्यात भूकंपाचे धक्के जाणवत असताना आता महाराष्ट्रातही भूकंपाचे हादरे बसायला लागले आहेत. साताऱ्यातील कोयना परिसरात २.६ रिश्टर तीव्रतेचे भकंपाचे धक्के...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील अपघातात मुलासह आई-वडिलांचा मृत्यू

वाशिम – नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.  हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला....
Read More
post-image
विदेश

एअर फ्रान्स ७,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका इतर विमान कंपन्यांप्रमाणेच एअर फ्रान्सनालाही बसला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एअर...
Read More
महाराष्ट्र

एसबीआयच्या ५ कर्मचाऱ्यांना कोरोना, परळीसह १६ गावांमध्ये लॉकडाऊन

बीड – परळीतील स्टेट बँक ऑफ इंडियातील ५ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे काल उघडकीस आल्यानंतर आजपासून परळी शहर आणि परिसरातील १६ गावांमध्ये ८ दिवसांचा...
Read More
post-image
महाराष्ट्र

धुळे पालिका क्षेत्रातील सर्व दुकाने सोमवारपासून ४ वाजताच बंद होणार

धुळे – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. त्याबरोबरच मिशन बिगिन अगेन राबवीत जनजीवन पूर्व पदावर आणण्याचा प्रयत्न करीत...
Read More